इंदापूर तालुक्यातील,भाजप नेते व माजी मंत्री मा.हर्षवर्धन पाटील हे बावडा येथे आज रविवारी (दि.29) पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने आले होते. त्यानंतर ते शेळगाव भागाकडे नियोजित दौऱ्यासाठी निघाले असता रत्नाई बंगल्यानजीक असलेल्या दिलीप लोखंडे या हॉटेल मालकाने मा.हर्षवर्धन पाटील यांना चहासाठी बोलविले.
या हॉटेलमध्ये काऊंटरच्या टेबलावर बसून गप्पा मारत सन 1980 पासून मा.हर्षवर्धन पाटील चहा घेतात, हे बावडेकरांना माहीत आहे. हॉटेल मालक लोखंडे यांचा आग्रह मा.हर्षवर्धन पाटील कधीच मोडत नाही. हॉटेलमध्ये मा.हर्षवर्धन पाटील यांनी सवयीनुसार नेहमीच्या टेबलावर बसून ग्रामस्थांसमवेत हास्यविनोद करत मनसोक्त गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये अनेक वेळा हास्याचे फवारे उडाले. हास्यविनोदामुळे उपस्थित ग्रामस्थही खुश झाले व घाईने मा.हर्षवर्धन पाटील पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.*
______________________________
टिप्पण्या