इंंदापूरःसंविधान आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे. आज भारतीय संविधानदिना निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य व इसमा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्ष कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी बावडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब कांबळे, भीमराव कांबळे, महादेव कांबळे, अनिल कांबळे, अशोक कांबळे, बापूसाहेब कांबळे, सिद्धार्थ कांबळे, भंतेजी गौतम जगताप व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
टिप्पण्या