मंडप व्यवसाय किती दिवस बंद ठेवणार ? नवरात्रोत्सवापासून परवानगी द्या हर्षवर्धन पाटील इंदापूर:प्रतिनिधी नागरिकांची जनजनजीवन, बाजारपेठा सध्या पूर्ववतपणे सुरु झालेल्या आहेत.सध्या शासनानेही बहुतेक सर्व व्यवसाय सुरू करण्यास नियम व अटी घालून परवानगी दिलेली आहे. सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू असताना गावोगावच्या मंडप व्यावसायिकांवरच बंदी का ? आणखी किती दिवस मंडप व्यवसाय बंद ठेवणार ? असा परखड सवाल भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.30) उपस्थित केला. शासनाने नवरात्रोत्सवापासून मंडप व्यवसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्यास नियम व अटी घालून परवानगी द्यावी,अशी मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली. मंडप व्यवसायिकांना तातडीने मंडप व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना आजच पाठविण्यात येईल,असे पाटील यांनी सांगितले. शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती ब...
SHIVSRUSTHI NEWS