इंदापुर:आज रविवार दि. १३ सप्टेंबर 2020 आदरणीय श्रद्धेय कै. शंकररावजी (भाऊ )पाटील यांच्या पुण्यतिथीचा दिवस व १४ वे पुण्यस्मरण. इंदापूर कॉलेजमध्ये कर्मयोगी भाऊंच्या समाधी दर्शनासाठी गेल्यावर राजवर्धन पाटील म्हणाले की एका अनोख्या सामाजिक राजकीय व्यक्तिमत्त्वची नेहमीच वेगळी अनुभूती लाभते. कर्मयोगी भाऊ (आजोबा) हे माझ्यासाठी नेहमीच हा एक विचार, एक शुद्ध आचार, एक प्रेरणाशक्ती, दिव्यत्वाची अनुभूती आणि समाजाप्रति असणारी जाणीव आणि जागृती आहे. आज मी जेंव्हा तालुक्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य करत असताना कर्मयीगी भाऊ आजोबांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना भेटतो तेव्हा त्यांच्या आठवणी लोक ज्या आत्मयतेने मांडतात, त्यातून मला सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा मिळत असते.असे मत राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे,भाऊंच्या कुळात आपला जन्म झाला याचे समाधान आणि अभिमान वाटतो. आदरणीय कर्मयोगी भाऊंना शत शत नमन करून कर्मयोगीच्या विचाराचे बंधन बांधून आज मी कृतकृत्य झालो. आजोबा आपणास मनोभावे आदरांजलीआसे राजवर्धन पाटील म्हणाले
या वेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते हा कार्यक्रम सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला आहे.
टिप्पण्या