इंदापुर :मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापरच्या संचालिका आयु. अस्मिताताई संतोष मखरे यांनी दि.24 ऑगस्ट 2020 रोजी 450 बेड असणार्या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जि.प.कोविड रुग्णालय हिंजवडी (विप्रो हाॅस्पिटल) येथे सहाय्यक अधिसेविका म्हणुन कार्यभार स्विकारला. घरातील लोकांचा विरोध असताना देखील आणि नोकरीची आवश्यकता नसताना त्यांनी सामाजिक बांधिलकी
म्हणून स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता हा जाॅब स्विकारला. हाॅस्पिटल मध्येच राहुन त्या 24 तास तेथील कोरोना पेशंटची देखभाल करतात.त्या तेथील इनचार्ज असल्याने तेथील 450 कोरोना पेशंटचे उत्कृष्ट नियोजन करतात.कोरोना पेशंटला डाॅक्टरही तपासायला घाबरतात अशा 450 कोरोना पेशंटला त्या दररोज हाताळतात. पेशंट दगावल्यास त्या स्वतः ती डेड बॅडी पॅक करतात.असे अनेक मन हेलावून टाकणारे अनुभव त्यांनी सांगितले.मखरे कुटुंबाकडुन सामाजिक कार्याचा वसा मिळाल्याने त्या ही जीवघेणी ड्युटी करत असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणुनच भिमाई प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार सर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
टिप्पण्या