इंदापुर:मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा जन इंदापूर यांच्यावतीने इंदापूर तहसील कार्यालय येथे
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा. तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा. सर्वोच्च
न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षण स्थगिती आदेश संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
1) मा. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सुपूर्त करताना जो स्थगिती आदेश दिला आहे, राज्य सरकारने घटना तज्ञांचा सल्ला घेऊन सदरची स्थगिती उठविण्यासाठी
आवश्यक ती कायदेशीर बाब अवलंबित करावी त्यात पहिला पर्याय आहे तो मा. मुख्य न्यायमूर्ती कडे
अर्ज करून घटना पिठाची स्थापना करून स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावेत.
2) न्यायालयाचा स्थगिती आदेश येण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन व नियुक्त्या निवड
जाहीर झालेल्या आहेत या संरक्षित करण्यात याव्यात मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यामुळे
विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे ते शासनाने होऊ देऊ नये.
3) स्थगिती उठविण्याचा बाबतचा निर्णय येईपर्यंत SEBC प्रवर्गातील घटकांना व विद्यार्थ्यांना
आरक्षण सोडून ज्या सवलती आहेत ते सूरू ठेवाव्यात अशी आमची मागणी आहे.आसे निवेदनात म्हटले आहे,या निवेदनावर प्रा.डाॅ. सौ.जयश्री गटकुळ, गणेश रणदिवे, राहुल गुंडेकर, जयश्री खबाले, प्रदिक झोळ, यांच्या सह्या आहेत,
टिप्पण्या