इंदापुर:गेली अनेक महीने कोरोना ने आपल्या देशात थैमान घातले आहे, हा महाभयंकर व्हायरस मुळे अनेक जनांचे बळी घेतले आहेत,तेही केवळ काळजी न घेतल्या मुळे,मास्कचा व सॅनिटायझर चा वेळोवेळी योग्य वापर न केल्यामुळे व इतरांच्या चुकांमुळे या भयानक प्रकाराला बरेच निरापराध लोक बळी पडले आहेत,आसे मत श्रीधर बाब्रस माजी नगरसेवक यांनी व्यक्त केले,
कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून इंदापुर येथील काही गरजू लोकांना सॅनेटायझर आणि मास्क वाटप करुन सामाजिक संदेश दिला आहे.बाब्रस यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, या वाढदिवसासाठी होणा-या वायफळ इतर खर्च टाळून त्यांनी मास्क आणि सॅनेटायझर देण्याचे ठरविले. यांच्या या निर्णयामुळे वाढदिवसादिनी त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने एका बागेला धर्मवीर संभाजी महाराज उद्यान आसे नाव देण्यात आले पूर्वी नामकरण झाले असले तरीही बॉर्ड लावून अधिकृत नामकरण करण्यात आले, त्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप दादा गारटकर छत्रपती संभाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस यांच्या हस्ते करण्यात आले
श्रीधर बाब्रस यांच्या वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला, धर्मवीर संभाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस यांच्या वतीने श्रीधर बाब्रस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकशाहिर आण्णा भाऊ साठे वाचनालयास १५खुर्च्या भेट देण्यात आल्या, यावेळी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप दादा गारटकर माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे नगरसेवक दादासाहेब सोनवणे, मयूर ढावरे नगरसेविका राजश्री मखरे,
उपस्थित होते, यावेळी वाफेच्या मशिनचे उदघाटन करण्यात आले
, श्रीधर बाब्रस
यांच्या हस्ते इतर ठिकाणाहून येणा-या अनेक लोकांना कोरोना पासुन बचाव करण्यासाठी ३५०मास्क आणि ३५०सॅनेटायझर प्राथमिक स्वरूपात वाटप केले.
लहान मुलांची व जेष्ठ नागरिक यांची रोग प्रतिकारक क्षमता कमी असते त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे असं मत धर्मवीर संभाजी महाराज मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस यांनी व्यक्त केले.
कोणी बिगर मास्कचा दिसला की त्यांना मास्कचे वाटप करून मास्क का वापरावे हे समजून सांगण्यात आले,
अनेकजन कसेही फिरतात, त्यांना या रोगाचे दुष्परिणाम माहीत नाही. त्यामुळे आम्ही मास्क आणि सॅनेटायझरचे वाटप केले असल्याचे सामाजिक कार्यात अग्रेसर आसणारे माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी सांगितले.
.या वेळी विनायक बाब्रस, माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले माजी नगरसेवक हरिदास हराळे मनोज भापकर, अनिल चव्हाण, हर्षवर्धन कांबळे ,समीर दूधनकर, गणेश गुजर, पप्पू शेख, बापू भिसे, इसाक शेख , इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला आहे,
टिप्पण्या