इंदापुर:भारतीय राजकारणी माजी संसद सदस्य कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील (भाऊ) यांच्या 14 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इंदापूर महाविद्यालयाच्या परिसरातील भाऊंच्या समाधी स्थळाचे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पदमा भोसले आणि मान्यवरांनी दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.
कर्मयोगी परिवाराने उपस्थित राहून समाधी स्थळाचे दर्शन घेतले. इंदापूर महाविद्यालयात दरवर्षी भाऊंच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असते परंतु यावर्षी कोरोना पार्श्वभूमी व लॉक डाऊन यामुळे हे कार्यक्रम होऊ शकले नाहीत.
इंदापूर तालुक्याच्या जडणघडणीमध्ये भाऊंचे योगदान मोठे असून एक आदर्श विचार आणि समाज विकासामध्ये सहकाराच्या माध्यमातून केलेले कार्य मोठे आहे. भाऊ हा एक विचार असून खऱ्या अर्थाने भाऊ कर्मयोगी होते असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
यावेळी संस्थेचे साचिव मुकुंद शहा, खजिनदार ॲड. मनोहर चौधरी, संचालक तुकाराम जाधव, अशोक कोठारी, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, भागवत गटकुळ, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा.नागनाथ ढवळे उपस्थित होते.
टिप्पण्या