इंदापूर:पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत असून त्याच प्रमाणे रुग्ण बरे होवून घरी जाण्याचे प्रमाणही जास्त असल्यामुळे काही अंशी का होईना नागरिकांना दिलासा मिळत आहे. असाच एक कोरोना योद्धा, इंदापुर तालुक्यातील, नामांकित यशोदिप हाॅस्पिटल चे डाॅ.अविनाश पानबुडे एम.डी.मेडीसीन यांनीही कोरोनावर मात केल्यानंतर त्यांचे इंदापुर शहरात मोठ्या उत्साहाने आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विचार मंथन परीवाचे सदस्य आसल्याचे अॅडमीन मा.प्रकाशराव पवार यांनी सांगितले,या वेळी मा .रमेश आबा शिंदे ( ग्रुप अॅडमिन आपल इंदापूर )मा .डॉ .बोंगाणे ( सर )
मा . गणेश घाडगे .मा . सोमनाथ लांडगे
मा .गणेश टुले .मा . अमोल पाटोळे उपस्थित होते डाॅ. पानबुडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना पुणे,मुंबई
येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. कोरोनाचा धोका हा बालकांना आणि वृद्धांना जास्त असल्याचं म्हटलं जातंय. पण असं असलं तरीही या नकारात्मक वातावरणात एक दिलासा देणारी बातमी म्हणजे डाॅ. अविनाश पानबुडे यांनी कोरोनावर मात करून ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहे. त्यांच्यावर शहरात पुष्पवृष्टी करण्यात आली,
टिप्पण्या