इंदापुरः तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2020-21 चा 31 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ आज विधीवत पुजेसह कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे आदरणीय चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो, व्हाईस चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले व सर्व संचालक मंडळ यांचे शुभहस्ते संपन्न झाला. बॉयलर अग्निप्रदिपन समारंभानिमित्त आयोजित श्री. सत्यनारायण महापुजा श्री. सुभाष बलभिम काळे, संचालक व सौ. सविता सुभाष काळे या उभयतांचे शुभहस्ते संपन्न झाली.
या गळीत हंगामातील कारखान्याच्या मशिनरी ओव्हरहॉलिंगची सर्व कामे पूर्ण होत आली असून ऊस तोडणी यंञणा सज्ज करणेचे काम सुरु आहे. यावर्षी कारखान्यास 14 लाख मे.टन कार्यक्षेञातील नोंद बिगरनोंद तसेच कार्यक्षेञाबाहेरील 2 लाख असा एकूण 16 लाख मे.टन ऊस उपलब्ध आहे. गाळप हंगामाकरिता कारखान्याने 575 ट्रक/टॅक्टर करार करुन ऍ़डव्हान्स वाटप केलेले आहे व 700 बैलगाडी तसेच 450 टॅक्टरगाडी करार केलेले आहेत. तोडणी प्रोग्रॅम कॉम्प्युटराईज्ड करणेत येत असल्याने ऊस तोडणी व वाहतुकीसाठी कोणतीही अडचण येणार नाही.
यावर्षी आपले कार्यक्षेञामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे, त्यामुळे कारखान्यास ऊसाची उपलब्धता मुबलक आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील यांनी सर्व ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे वाहतुकदार, तोडणी मुकादम व सर्व कामगारांचे सहकार्याने येणारा हा गळीत हंगाम यशस्वी करणेचा मानस व्यक्त केला.
या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक श्री. भरत शहा, श्री. भास्कर गुरगुडे, श्री. विष्णू मोरे, श्री. हनुमंत जाधव, श्री. मच्छिंद्र अभंग, श्री. अंकुश काळे, श्री. सुभाष काळे, श्री. प्रशांत सुर्यवंशी, श्री. यशवंत वाघ, श्री. मानसिंग जगताप, श्री. राजेंद्र गायकवाड, श्री. राहूल जाधव, श्री. अंबादास शिंगाडे, श्री. वसंत मोहोळकर, श्री. केशव दुर्गे, श्री. अतुल व्यवहारे, श्री. राजेंद्र चोरमले, श्री. पांडुरंग गलांडे, श्री. सुभाष भोसले, सौ. जयश्री नलवडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.बाजीराव जी. सुतार, व सर्व खाते विभागप्रमुख उपस्थित होते.
टिप्पण्या