इंदापुर: सर्वोच्च न्यायालय निकाल दि. ९-९-२०२० नुसार आर्थिक दुर्बल घटकातील
मराठा युवकांनी दहा टक्के आरक्षण लाभ घेणे संदर्भात
मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ९-९-२०२० रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने लागू केलेले शिक्षण व नोकरीतील आरक्षण २०२०-२१ या वर्षासाठी स्थगित केले आहे . या परिस्थितीत मराठा समाजातील सर्व मुला मुलींनी केंद्र सरकारने सन २०१९ च्या कायदाने दिलेल्या दहा टक्के इडब्लूएस - आर्थिक दुर्बल घटकांना लागू असलेल्या या आरक्षणाचा लाभ घ्यावा . हे आरक्षण अखिल भारतीय पातळीवर तसेच सर्व राज्यातील शासकीय नोकरीसाठी लागू आहे.
इडब्लूएस *EWS :- ECONOMICALLY WEAKER SECTION..*
आरक्षण उत्पन्न दाखला सादर केले तरच मिळते. तो दाखला काढणे व इतर अटी शासकीय कार्यालयात मिळू शकेल. महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत
(१) दहा टक्के इडब्लूएस आरक्षण हे फक्त उत्पन्न दाखला सादर केला तरच मिळते अन्यथा नाही.
(२) जे समाज घटक एससी एसटी ओबीसी अंतर्गत समाविष्ट नाहीत अशाच आर्थिक दुर्बल घटकांना हे आरक्षण लागू होते .
(३) सन २०१९-२० या आर्थिक वर्षात सर्व कुटुंबातील सदस्यांचे सर्व प्रकारचे एकूण उत्पन्न आठ लाख रुपये पेक्षा जास्त नसावे .
(४) सर्व कुटुंबाकडे मालकीचा नगरपालिका क्षेत्रातील नगरात शंभर चौरस यार्ड पेक्षा मोठा रिकामा प्लॉट नसावा.
(५) ग्रामीण भागात दोनशे चौरस यार्ड पेक्षा मोठा रिकामा प्लॉट नसावा.
(६) सर्व कुटुंबियांचे एक हजार चौरस फूट पेक्षा मोठे घर नसावे .
(७) सर्व कुटुंबियाकडे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन नसावी .
*दाखला काढणे ...*
*EWS प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्र:-*
१) वंशावळ
२) राशन कार्ड
३) आधार कार्ड
४) मतदान कार्ड
५) १९६७ चा जातीचा पुरावा
६) जात प्रमाणपत्र
८) वडील व काका चे निर्गम
९) भाऊ बहिणीचे निर्गम
१०)तहसीलदार प्रमाणित उत्पन्न प्रमाणपत्र
११) परिपत्र अ व ब
वरील यादीनुसार सर्व माहिती भरुन व कागदपत्रे जोडून जिल्हाधिकारी , अतिरिक्त जिल्हाधिकारी , उप जिल्हाधिकारी , तहसीलदार यांच्याकडे इडब्लूएस आरक्षण साठी उत्पन्न दाखला मिळण्यासाठी लेखी अर्ज सादर करावा .
उत्पन्न दाखला नमुना सर्व भारतीयांना एकच लागू आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे..
याप्रमाणे इडब्लूएस उत्पन्न दाखला मिळाल्यानंतर तुम्हाला केंद्र व राज्य शासनाच्या सर्व प्रकारच्या क्षेत्रातील नोकरीसाठी अर्ज करता येतो. *मराठा युवकांनी* या आरक्षणाचा लाभ घेताना गुगल वर इडब्लूएस अशी कमांड दिली तर सर्व माहिती उपलब्ध आहे. तेथे शोध घ्यावा.
जे जे युवक या इडब्लूएस आरक्षण मध्ये बसत असतील त्यांनी वेळ न घालवता तातडीने उत्पन्न दाखला मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्याची कारवाई करावी असे आवाहन जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्षा प्रा डॉ जयश्री भास्कर गटकुळ यांनी केले आहे.
टिप्पण्या