इंदापुरः तालुक्यातील बाभुळगाव येथील दौऱ्यावरती असताना श्री. भरत रामचंद्र आसबे यांनी नवीन मोटरसायकल घेतली राजवर्धन पाटील आल्यानंतर त्यांनी नवीन मोटरसायकलची पूजा करण्याचा विनंती केली पाटील, लगेच गाडीतून उतरून त्यांची नवीन मोटरसायकली ची पूजा केली व त्यांना स्वतः गाडीवरती बसवून राजवर्धन पाटील यांनी त्यांची गाडी चालू करून त्यांना त्यांच्याच गाडी वरून पूर्ण गावातून चक्कर मारली. यानंतर बाभुळगाव गावचे युवा कार्यकर्ते अमोल इंगळे यांच्यासोबत मोटारसायकल चालवण्याचा आनंद घेतला..
राजवर्धन पाटील हे मोटर सायकल चालवत आहे हे पाहून आसबे यांना खूप आनंद झाला. राजवर्धन पाटील हे तालुक्यात सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात, लोकांना वेळोवेळी मदत करत असतात, त्यांनी तालुक्यातील राजकारणाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. राजवर्धन पाटील हे तालुक्याच्या राजकारणामध्ये पूर्णपणे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही अशी सर्वसामान्य जनतेमधून हाक येत आहे. राजवर्धन पाटील म्हणजे आपले हक्काचे नेतृत्व अशी जनतेमध्ये भावना निर्माण झाली आहे तालुक्यांमध्ये काहीही सुखदुःखाच्या गोष्टी असू राजवर्धन पाटील तेथे उपस्थित असतात व आपल्या दुःखात आनंदात सहभागी होतात अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे आज एका सर्वसामान्य माणसाची मोटर सायकल चालवून ते त्यांच्या आनंदात सहभागी झाले आहेत.
या वेळी सॅनिटायझर व मास्कचा वापर करून हा कार्यक्रम पार पडला आहे, कोरोना या महाभयंकर व्हायरस मुळे अनेक जनांना जिव गमवावा लागला आहे, तरी आपण मास्कचा वापर करा आसेही या वेळी राजवर्धन पाटील यांनी सांगितले,
टिप्पण्या