कर्मयोगी शंकरराव (भाऊ) बाजीराव पाटील यांचा १४वी पुण्यतिथी महात्मा फुलेनगर बिजवडी हायस्कूलमध्ये साजरी करताना कारखान्याचे संचालक श्री मच्छिद्र अभंग ग्रामपंचायत सदस्य श्री देवीदास यादव व नुतन मुख्याध्यापक श्री शिवाजी कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन प्रतीमेस अभिवादन केले व प्रशालेच्या मैदानात वृक्षारोपण करुन स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
त्यावेळी संचालक मच्छिद्र अभंग म्हणाले की भाऊ म्हणजे एक नितीमूल्याधिष्ठित आचरणाचा आदर्श आहेत त्यांनी तालुक्यात सामाजिक राजकिय धार्मिक केले अनेक संस्था, बॅंका, कारखाना, कृषी उत्पन्न समितीची स्थापना, करुन शेतकरी कामगार यांचे हित जोपासण्याचे काम केले त्याच बरोबर शिक्षणाची गंगा आणली गावोगावी शाळा काडून ग्रामिण भागातील मुलगा मुलगी शिक्षणापासुन वंचित रहाणार नाही ती शिकली पाहिजे असे धोरण होते अशा महान व्यक्तिचे कार्य श्रेष्ठ होते असे गौर उद् गार काडून भाऊंच्या कार्याची माहिती दिली. त्यावेळी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन अशोक भोईटे सर व सर्व शिक्षकांनी केले,हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला आहे
टिप्पण्या