इंदापूर :तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आज इंदापूर विचार मंथन परिवारातर्फे राधिका पॅलेस याठिकाणी करण्यात आला.
यावेळी श्रमिक पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सुरेश मिसाळ, कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देवा राखुंडे, तालुका प्रसिद्धीप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल विजय शिंदे, संघटक पदी निवड झाल्याबद्दल शिवाजी पवार, तसेच मुख्य सल्लागार राहुल ढवळे, पुणे जिल्हा वारकरी संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब उगलमोगले, कार्यकारी सदस्य इम्तियाज मुलानी, सिद्धार्थ मखरे, यांचा सन्मान करण्यात आला.
इंदापूर विचार मंथन परिवार ग्रुप हा सर्वसामान्य लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आला असून,इंदापूर शहर व परिसरामध्ये या ग्रुपच्या माध्यमातून धान्य किट, आरोग्यसेवा, व इतर तत्पर सेवेसाठी ग्रुपमधील सदस्य नेहमीच अग्रेसर असतात.
या ग्रुपचे संस्थापक इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद तात्या वाघ,पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संघटक शिवाजीराव मखरे, इंदापूर तालुका रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष संदिपान कडवळे, सामाजिक कार्यकर्ते नितीन आरडे, प्रा.शरद झोळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,,
यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष अरविंद तात्या वाघ म्हणाले की श्रमिक पत्रकार संघाने इंदापूर तालुक्यातील सामान्य जनतेचा दुवा म्हणून काम करावे व गोरगरीब जनतेच्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी नेहमीच अग्रेसर निपक्षपातीपणे निर्भीडपणे काम करावे.
यावेळी संदिपान कडवळे, शिवाजीराव मखरे, शकील सय्यद, देवा राखुंडे, सुरेश मिसाळ, यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष शकील सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या..
या वेळी नदीम बागवान, माणिक तनवडे,सहदेव लोखंडे, हनुमंत गोसावी, आदी उपस्थित होते.
टिप्पण्या