इंदापुर :तालुक्यातील शेतक-यालाच नव्हे तर संपूर्ण देशात हेच चाललय आसे जरी लोकं म्हणत आसतील तरीही ...इंदापुर तालुक्यातील शेतक-यांची,व्यथाच वेगळी आहे,..... एकीकडे कोरोना ने मारलं, आणी दुसरीकडे जणता कर्फ्यु करून प्रशासनाने तर पार जिवच मारलं रावं ,ज्यावेळी जनता कर्फ्यु ची मिटींग होती, तेंव्हा,त्यांनी फक्त काही मोजकेच लोकं, कार्यकर्ते, व तेच मुठभर व्यापारी यांना, बोलावलं आणि जनता कर्फ्यु लावला,हा निर्णय जनतेच्या हितासाठी घेतला आहे का..? याचे जरा आमदारांनी आत्मपरीक्षण करावे,पण शेतकरी वर्गाचा साधा विचार ही यात केला नाही,त्यांच्या भाज्या, शेतमाल, सडतील, वाळतील ,याचा साधा विचार ही केला नाही,ज्यांनी मतं दिली त्यांनाच आशी वागणूक,.....रामजाने...!आशी सर्वत्र चर्चा आहे, आम्ही शेतकरी कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करतच आहोत, पण यात राजकारण करणं आता बंद करणे गरजेचे आहे,कोरोना ला हरवणं गरजेचे आहे, पण सामान्य नागरिकांना वेठीस धरून नव्हे,आमदार हे तालुक्यातील जनतेचे मायबाय आसतात, आणि माय बापाने जनतेची काळजी पोटच्या मुला सारखी घ्यायची आसते, पोळा या सणासाठी सुट देणे गरजेचे होते, हा जनता कर्फ्यु म्हणजे,"आई खाऊ देईना. आणि बाप भिक मागूदेईना "आशी अवस्था इंदापुर तालुक्यातील लोकांची केली आहे,.आशी तालुक्यातील जनतेत चर्चा आहे, ..शेतकरी वर्गात तीव्र निराजी व्यक्त केली जात आहे, एका शेतक-याला बैल पोळ्यावर माहीती विचारली आसता,त्यांनी खालील माहिती दिली,
कारण, कंडा, गोंडा हिंगूळ, मोरकी, वेसन, सुत,झुली, बाशिंग,रंग काही अपवाद वगळता मिळत नाही,बाजार पेठेत काही दुकान दार अपवाद वगळता चढ्या भावाने सामान विक्री करतात, १२०रूपये किलो चे सुत (दावं)१५०रूपयांना विकतात, ५०रुपये जोडीचा कंडा-गोंडा ८०रूपयांना विकतात कोरोना च्या नाखाली शेतक-याची लुट, जगाचा पोशिंदा आसणारा शेतकरी आत्महत्या करेल ....नाही तर काय उपाशी झोपेल, प्रत्येक जन शेतक-यालाच लुटतोय...
बैल पोळा हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो.पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद मळणी' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात.बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.
या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात.गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर) आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/श्रीमंत जमीनदार) तोरण तोडतो व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.
या सगळ्या प्रकारावर कोरोना ने सगळ्या आनंदावर पाणी पडलं आहे,
टिप्पण्या