इंदापुर येथील राधिका गणेश उत्सव मंडळाच्या उपक्रमांचा आदर्श इतरांनी घ्यावा इंदापूर:शहरातील राधिका गणेश उत्सव मंडळ गणपती चौक कालठण रोड इंदापूर यांच्या श्री.गणेश उत्सव मंडळाची आरती. इंदापुर तालुक्यातील अनेक दिग्गज मंडळींच्या हस्ते करण्यात आली आहे, आजच्या आरतीचे मानकरी मा. शिवाजीराव मखरे जिल्हा संघटक आरपीआय, मा. संदिपान कडवळे अध्यक्ष आर.पी.आय.इंदापुर, मा.विशाल चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते, मा.माऊली नाचण सामाजिक कार्यकर्ते, मा. हनुमंतजी कांबळे वंचित बहुजन आघाडी चे इंदापुर शहराध्यक्ष, मा. हम्मीदभाई आत्तार सामाजिक कार्यकर्ते यांचे शुभ हस्ते सोमवार दिनांक ३१.०९.२०२० रोजी सायंकाळी ७.०० वाजता राधिका सेवा संस्था इंदापूर या गणेश उत्सव मंडळाच्या श्री. गणेशाची पुजा करून आरती वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली..... यावेळी पारस पाईपचे सर्वेसर्वा धर्मचंद (पप्पा)लोढा यांच्या वतीने श्री. विपुल शेठ लोढा यांच्या हस्ते सॅनिटायझर फवारणीच्या दोन मशिन या मंडळा कडे सुपूर्त करण्यात आल्या, ...
SHIVSRUSTHI NEWS