इंदापुरः तालुक्यातील प्रा.सौ.डाॅ. जयश्री गटकुळ पुणे,जिल्हाअध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड यांच्या घरी गौरींचे आगमन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणा मध्ये सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आले.या वेळी सौ.गटकुळ यांनी कोविड योद्ध्याच्या वेशभूषेत गौराई ची स्थापना केली, या वेळी परिवारातील महिला लहान मुले मुली उपस्थित होत्या. महिलांनी एकञ येऊन एकमेकींना हळदी-कुंकू लावून, गौरीचे औक्षण करून गौरी-गणपतीचे स्वागत मोठ्या थाटा-माटात साजरे केले यावेळी सोशल डीस्टंशनचे पालन करण्यात येवुन महिलांना कोरोना विषयी जन जागृती करुन घाबरु नका पण स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी. असे अवाहन जयश्री गटकुळ यांनी करुन गौरीच्या आगमनाचे स्वागत अगदी मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात करण्यात आले.
प्रा.सौ.डाॅ. जयश्री गटकुळ यांनी स्वतःच्या घरी कोविड योद्ध्याच्या वेशभूषेत गौराई ची स्थापना केल्यामुळे इंदापुर तालुक्यातील विविध लोकांनी त्यांचा आदर्श घ्यावा आसे अनेक जन म्हणाले,
टिप्पण्या