इंदापुर: कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आज सकाळी महाराष्ट राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे आदरणीय चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो यांचे 57 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन समारंभ संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
कर्मयोगी भाऊंचे प्रतिमेस अभिवादन करून अभिष्टचिंतन कार्यक्रमास सुरूवात झाली. प्रथम कारखान्याचे सर्व संचालक यांचे शुभहस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो यांनी मोठे भाऊ यांचे पावलावर पाऊल ठेवून समाजकार्य चालू ठेवले आहे, त्यास ताईंचे पाठबळ आहे, तसेच कारखान्याचे कामकाजाबाबत माहिती दिली. कोरोनाबददल बोलताना त्यांनी जलनितीचा वापर करावा ज्यामुळे आपण या असाध्य रोगापासून दूर राहू शकतो असेही सांगितले.
समारोप व आभार भाषणामध्ये कारखान्याचे संचालक अंबादास शिंगाडे यांनी बोलताना श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो यांनी 20 वर्षे महाराष्टाच्या मंञीमंडळामध्ये उत्क़ष्टपणे काम केले. त्या कामास प्रशासनामध्ये तोड नाही. अधिकारी व प्रशासन यांचे समन्वनयाने त्यांनी आपले तालुक्यातील भरपूर कामे मार्गी लावली. अशी माहिती दिली.
या वाढदिवस कार्यक्रमानिमित्त कारखान्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते, त्यामध्ये कामगारांचे उस्फुर्त सहभागामुळे 101 बाटल्यांचे संकलन करणेत आले. कर्मयोगी कारखान्यावर मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो व मा.श्रीमती पदमाताई भोसले यांचे संकल्पनेतुन नुकतेच 6000 दिर्घायुषी झाडांचे लागवड करणेत आली असून या वाढदिवसानिमित्त आणखी 500 झाडांची लागवड आज करणेत आली. आणि “व्रुक्षमिञ” म्हणून लावलेल्या झाडांचे संगोपन करणेचा संकल्प सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केला आहे. यानंतर कारखाना परिसरामध्ये स्वच्छता करणेत आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी केले. समारोप कारखान्याचे संचालक अंबादास शिंगाडे यांनी केले. सुञसंचालन व आभार कारखान्याचे कार्यालय अधीक्षक यांनी केले. या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमास कारखान्याचे संचालक श्री. राजेंद्र गायकवाड, श्री. भास्कर गुरगुडे, श्री. सुभाष काळे, श्री. मच्छिंद्र अभंग, श्री. प्रशांत सुर्यवंशी, श्री. मानसिंग जगताप, श्री. यशवंत वाघ, श्री. अंबादास शिंगाडे, तसेच भावडी गावचे सरपंच श्री. देशमुख, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करुन व शासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.
टिप्पण्या