इंदापुर :इंदापूरचा मोहरम सण हा पुणे जिल्हयात प्रसिद्ध आहे . या सणाला सर्वधर्मीय एकत्र येऊन मोठया प्रमाणात साजरा केला जातो .परंतु या वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे मोहरम हा सण साध्या पध्दतीने घरगुती वातावरणात साजरा होत आहे,या सनाबद्दल माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार म्हणाले की
पैगंबर म्हणजे इस्लामचा 'पैगाम ' निर्माण करणारे
त्यांना या धर्माचा 'इल्म' झाला. त्यांना जेव्हा याचा
'इल्म' झाला म्हणजे दृष्टांत झाला त्यावेळेस त्यांना आपण
काय बोलत आहोत, कुठे आहोत याची जाणीव उरलेली
नव्हती. त्या दिवसापासून यांना, "सल्लील्लाहू अलेह
वसल्लम हजरत पैगंबर नबी" अशी ओळख मिळाली.
सुरवातीस हा युद्ध व रक्तपातास निशिद्ध असा महिना होता.
हा महिना तसा पवित्र होता, परंतु इमाम हुसेन शहिद
घटना याच महिन्यात घडली
हजरत पैगंबर नबी साहेबांचे मुलीकडून नातू असलेले हसन
व हुसेन यांना त्यांच्या शत्रूंनी इ.स. च्या सातव्या शतकात
करबला मैदानात शहिद झाले,अविष्कार करत ठार
मारले.हा ताबूत बनविण्याचा प्रघात चौदाव्या शतकात
विदेशी आक्रमक लंगडा अमीर तैमूरलंगने सुरू केला. या ताबुताचे तोंड मक्केकडे यांच्या श्रद्धास्थानाकडे करतात.
हुसेन यांचे हत्याकांड झाले त्या दिवशी त्यांना हुसेन यांच्या
नातेवाईकांना पाणीही मिळू होऊ दिले नाही, म्हणून आज
थंड पाण्याची सोय ठिकठिकाणी करतात. शेवटच्या दिवशी
सर्व ताबूतांची मिरवणूक काढतात. हा ताबूत प्रकार फक्त भारत, पर्शिया व इजिप्तमध्ये पाळतात. हा प्रकारअरबस्तानात पाळत नाहीत. ते हा प्रकार अधार्मिक मानतात.कट्टर मुसलमान ताबूत हा मुर्तीपुजेचा प्रकार म्हणून निषिद्ध मानतो. शेवटच्या दिवशी हे
एका लाकडाला 'पंजा' लावून
चांगले वस्त्र बांधतात.अशी आख्यायिका आसल्याची माहिती हमीदभाई आतार व सहकार्यानी सांगितली,
यावेळी इंदापूर शहरातील प्रसिध्द अशा सातपुडा भागातील शहरातील मानाची दुसरी सवारी ही पद्माकर राऊत यांची आहे . सवारीचा पारंपारीक धार्मिक कार्यक्रम विधिवत पध्दतीने घरीच प्रमुख पाच लोकात सोशल डिस्टनस ठेवून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला,यावेळी हमीदभाई आत्तार,प्रविण राऊत, सुरेश जाधव,आकाश क्षिरसागर , महेश माने हे उपस्थित होते .
टिप्पण्या