इंदापूर :येथे भाग्यश्री निवासस्थानी गौरी पूजना निमित्त पर्यावरणपूरक सजावटींसह आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.सौ.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील व कन्या कु.अंकिता पाटील यांनी दरवर्षी प्रमाणेच गौरी निमित्त आकर्षक देखावा उभारला आहे.
हळदी कुंकवाचे लेणं घेऊन गौरी आली... गौरी आली असे म्हणत गौरीचे इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी उत्साहात स्वागत करण्यात आले. गौराईचे मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीभावाने पारंपारिक पद्धतीने गौरीची विधिवत पूजा करण्यात आली.
गौरी वर्षभर सासरी राहून फक्त अडीच दिवस माहेरी म्हणजे आपल्या घरी येते अशी गौरी भक्तांची धारणा आहे .महिलाच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा हा सण आहे, अशी माहिती भाग्यश्री पाटील व कु.अंकिता पाटील यांनी दिली. "अतिथी देवो भव" या उक्तीनुसार प्रत्येक कुटूंबात आपल्याकडील गौरीसाठी फराळ, विविध देखावे, दिवाबत्ती ,पुजा ,नैवेद्य, आणि धन धान्याच्या राशी समर्पित करून आपल्या कुटुंबावर वर्षानुवर्षे कृपादृष्टी लाभावी,यासाठी मनोमना प्रार्थना करीत असतात. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात.
______________________________
टिप्पण्या