इंदापूर:तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शाहीर अमर शेख सभागृहामध्ये राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उच्च शैक्षणिक धोरण आणि डिजिटल एज्युकेशन टेक्नोलॉजी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना डॉ. संजय चाकणे यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर आणि डिजिटल टेक्नोलॉजी आधारित अनेक मुद्द्यांचे विश्लेषण केले.
डॉ. संजय चाकणे म्हणाले की,' या नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम, बहुभाषिक शिक्षण, मातृभाषेत शिक्षण, संशोधन डिजिटल टेकनॉलॉजिचे महत्त्व, शिकविण्याच्या व शिकण्याच्या नवीन पद्धतींचा अवलंब असणार आहे.उच्च शिक्षण संस्थांमध्ये अधिकाधिक विषय, तीन हजार किंवा त्याहून अधिक विद्यार्थी असलेल्या शैक्षणिक संस्था, प्रत्येक जिल्ह्यात अनेक विषयांचं शिक्षण देणारी किमान एक संस्था, सार्वजनिक संस्थांच्या विकासावर भर देणारा अभ्यासक्रम , ओपन डिस्टन्स लर्निंग आणि ऑनलाईन एज्युकेशनचे पर्याय , बौद्धिक, सामाजिक, शारीरिक, भावनात्मक आणि नैतिक क्षमतांचा विकास करण्याचं लक्ष्य, नॅशनल रिसर्च फाउंडेशनची (NRF) निर्मिती, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी शिक्षणाला प्राधान्य, व्यवसायिक शिक्षण सर्व संस्थांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट इ. नव्या शैक्षणिक धोरणाची संस्थात्मक वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली.'
या कार्यशाळेमध्ये प्राध्यापकांनी अनेक प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी केले.
यावेळी डॉ.शिवाजी वीर, डॉ. भिमाजी भोर, डॉ. सदाशिव उंबरदंड उपस्थित होते.
कार्यशाळेचे नियोजन व सूत्रसंचालन प्रा. संदीप शिंदे यांनी केले.आभार प्रा. सदाशिव उंबरदंड यांनी मानले.
==============================
टिप्पण्या