मा.श्री.हर्षवर्धनजी पाटील यांचे वाढदिवस वृक्षारोपण करून कांदलगाव मध्ये संपन्न
इंदापुर: महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री आदरणीय मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो यांचे 57 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन समारंभ संपन्न झाला. यावेळी
कर्मयोगी भाऊंचे प्रतिमेस अभिवादन करून अभिष्टचिंतन कार्यक्रमास सुरूवात झाली. कांदलगाव येथील दशरथ काका बाबर यांनी वृक्षारोपण करून साजरा केला,विशेष म्हणजे नारळाच्या झाडांचा समावेश करण्यात आला, कारण नारळाच्या झाडाला आयुष्य जास्त आसते, म्हणून आम्ही हर्षवर्धन पाटील यांना दीर्घायुष्य लाभो म्हणून नारळाच्या झाडांची निवड केली आसल्याची माहिती दशरथ काका बाबर-पाटील यांनी व्यक्त केले,
मोठे भाऊ यांचे पावलावर पाऊल ठेवून समाजकार्य चालू ठेवले आहे, त्यास ताईंचे पाठबळ आहे, तसेच
हर्षवर्धनजी पाटीलसो यांनी 20 वर्षे महाराष्ट्राच्या मंञीमंडळामध्ये उत्क़ष्टपणे काम केले. त्या कामास प्रशासनामध्ये तोड नाही. अधिकारी व प्रशासन यांचे समन्वनयाने त्यांनी आपले तालुक्यातील भरपूर कामे मार्गी लावली. अशे दशरथ काका बाबर म्हणाले.
हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करुन व शासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.
टिप्पण्या