इंदापुरः रविवार दि. ३०/०८/२०२० रोजी मौजे बाभूळगाव मधील युवा कार्यकर्ते चि. महावीर आसबे यांच्या शुभ विवाह सोहळ्याला आले असता, चि. महावीर आसबे नवरदेवच स्वतः पेशाने एक फेमस फोटोग्राफर असल्याचे दादांना समजले. त्यामुळे त्यांचा लग्नांची फोटोशूट तो स्वतः करू शकत नाही, ही अडचण विचारत घेऊन स्वतः जनसामान्यचे नेतृत्व राजवर्धनदादा पाटील यांनी फोटोग्राफर बनून महावीर आसबे यांच्या लग्नाचे फोटोशूट करत अनोख्या पद्धतीने शुभ कार्यास दादांनी शुभेच्छा दिल्या*. त्यामुळे आज त्यांचीतील फोटोग्राफर हा लग्न सोहळ्यातील उपस्थितांचा चर्चेचा विषय ठरला. मिळालेला राजकीय वारसा हा समाज कार्य करण्यासठीची प्रेरणा असून आपण त्याचा उपयोग फक्त राजकारणासाठी न करता समाजकारण देखील करून समजाच्या प्रत्यके प्रश्न सोडविण्याचे काम करू असे दादांच्या कृतीतून जाणवत होते. अशा दिलदार युवा नेत्यास व त्याच्या कार्यास आमचा सलाम.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या