मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज,शिवसृष्टी न्युज

 इंदापुर :इंदापूरचा मोहरम सण हा पुणे जिल्हयात प्रसिद्ध आहे . या सणाला सर्वधर्मीय एकत्र येऊन मोठया प्रमाणात साजरा केला जातो .परंतु या वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे मोहरम हा सण साध्या पध्दतीने घरगुती वातावरणात साजरा होत आहे,या सनाबद्दल माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार म्हणाले की 
पैगंबर म्हणजे इस्लामचा 'पैगाम '  निर्माण करणारे 
 त्यांना या धर्माचा 'इलहाम' झाला. त्यांना जेव्हा याचा'इलहाम' झाला म्हणजे दृष्टांत झाला त्यावेळेस त्यांना आपण काय बोलत आहोत,
 कुठे आहोत याची जाणीव उरलेली नव्हती. त्या दिवसापासून यांना, "सल्लील्लाहू अलेह
वसल्लम हजरत पैगंबर नबी" अशी ओळख मिळाली.सुरवातीस हा युद्ध व रक्तपातास निशिद्ध असा महिना होता.
हा महिना तसा पवित्र होता, परंतु इमाम हुसेन यांच्या वधाची घटना याच महिन्यात घडली म्हणून हा महिना अशूभ ठरला.
हजरत पैगंबर नबी साहेबांचे मुलीकडून नातू असलेले हसन व हुसेन यांना त्यांच्या शत्रूंनी इ.स. च्या सातव्या शतकात
करबला मैदानात "दर्दनाक मौतीचा" अविष्कार करत ठार मारले.हा ताबूत बनविण्याचा प्रघात चौदाव्या शतकात
विदेशी आक्रमक लंगडा अमीर तैमूरलंगने सुरू केला. या ताबुताचे तोंड मक्केकडे यांच्या श्रद्धास्थानाकडे करतात.
हुसेन यांचे हत्याकांड झाले त्या दिवशी शत्रूने हुसेन यांच्या नातेवाईकांना पाणीही मिळू होऊ दिले नाही, म्हणून आज
थंड पाण्याची सोय ठिकठिकाणी करतात. शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक काढतात. हा ताबूत प्रकार फक्त भारत, पर्शिया व इजिप्तमध्ये पाळतात. हा प्रकारअरबस्तानात पाळत नाहीत. ते हा प्रकार अधार्मिक मानतात.कट्टर मुसलमान ताबूत हा मुर्तीपुजेचा प्रकार म्हणून निषिद्ध
मानतो. शेवटच्या दिवशी हे
एका लाकडाला  'पंजा' लावून
चांगले वस्त्र बांधतात.अशी आख्यायिका आसल्याची माहिती हमीदभाई आतार व सहकार्यानी सांगितली,
        यावेळी इंदापूर शहरातील प्रसिध्द अशा सातपुडा भागातील शहरातील  मानाची दुसरी सवारी ही पद्माकर राऊत यांची आहे . सवारीचा पारंपारीक धार्मिक कार्यक्रम विधिवत पध्दतीने घरीच  प्रमुख पाच लोकात सोशल डिस्टनस ठेवून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला,यावेळी हमीदभाई आत्तार,प्रविण राऊत, सुरेश जाधव,आकाश क्षिरसागर , महेश माने हे उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते