इंदापुर:सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिव-पार्वतीचा पूत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते.
ज्या दिवशी शंकराने गणपतीला हत्तीचे तोंड लावून त्याला जिवंत केले त्या दिवशी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या दिवसाला गणेश चतुर्थी म्हटले जाते. त्यानंतर 11 दिवस चालणारा हा उत्सव अनंत चतुर्थीला गणपतीच्या विसर्जनानंतर संपतो.. भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी (साधारणत ऑगस्ट, सप्टेंबर या काळात ) गणेश चतुर्थी येते.
या काळात रोज सकाळी व संध्याकाळी त्याच्यापुढे आरती म्हटली जाते. मोदकाचा प्रसाद दिला जातो. अकरा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला मूर्तीचे नदीत किंवा तलावात विसर्जन केले जाते.
इंदापूरमधील, राधिका सेवा संस्थेत विराजमान बाप्पाच्या आरतीचा मान आनेक मान्यवरांना मिळाला होता त्यातच आजच्या आरतीचा मान, माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती,जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.प्रविण माने यांच्या शुभहस्ते करण्यात आली,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वत्र उत्सव साधेपणाने संपन्न होत असलेला पहायला मिळत असला, तरी विघ्नहर्ता नक्कीच आपल्यावर आलेले हे विघ्न लवकरच दूर करेल.
आरती करण्यात आलेल्या राधिका सेवा संस्थेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद(तात्या) वाघ हे संस्थापक अध्यक्ष असून. गेले २० वर्ष ही संस्था समाजकार्यात तत्पर आहे.
या राधिका सेवा संस्थे मार्फत अनेक गोरगरीब व सर्व धर्मिय जनते पर्यंत नेहमीच मदत झाली आहे, कोरोना सारख्या महाभयंकर व्हायरस मुळे लाॅकडाऊनच्या काळात, अनेक गरजूंना किटच्या माध्यमातून,मदतीचा हात पुढे करणारे राधिका सेवाभावी संस्था,
गणपती व दसरा चांगल्या प्रकारे साजरा करतात, घटस्थापणा च्या वेळी तुळजापुर येथून देवीची ज्योत घेऊन येणा-या मंडळांच्या लोकांना तुळजापुर पासून टेंभूर्णी पर्यंत काही कोणी देत नाही म्हणून त्यांना फराळ, चहा,केळी मसालेदुध देऊन कार्यकर्त्यांचा(अध्यक्षांचा) हार,नारळ व शाॅल फेटा देऊन सन्मान केला जातो व फराळा चे वाटप करण्यात येते,हा फारच मोठा कार्यक्रम या संस्था,व परिवाराच्या वतीने करण्यात येतो,
इंदापुर विचार मंथन परिवार हा एक what's up ग्रुप आहे, नेहमीच जीवनावश्यक वस्तू व सॅनिटायझर, मास्क लागेल ती मदत करण्याचे महाण कार्य यांच्या माध्यमातून नेहमीच घडले आहे, सलाम त्यांच्या कार्याला अशी सामान्य नागरिकातून बोलले जाते,
या विचारमंथन परिवाराच्या वतीने महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते, सभासदांचे वाढदिवस साजरे केले जातात, त्या साठी (राधिका हाॅल) या सुसज्ज वास्तुचा वापर केला जातो, या ठिकाणी सर्वच कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पाडला जातात,
अनेक सभासद व मित्र परिवार वेळोवेळी मदत करतात,व अनेक सामाजिक कार्यकर्ते निस्वार्थपणे कार्यकरत आसतात,वरील संस्था व ग्रुप चा आदर्श महाराष्ट्र तील इतरांनी घ्यावा,आशी सर्वत्र चर्चा आहे,
टिप्पण्या