आत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार शेतीच्या बांधावर कृषिदुत दाखल: आभ्यासाचा शेतकऱ्यांना फायदा होईल
वडापुरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि कार्यानभव कर्यक्रमा अंतर्गत(कृषि महाविद्यालय धुळे) येथील कृषीदुत वडपूरी गावामध्ये दाखल झाले असून या कृषि दुतांचा अभ्यासाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे . शिवाय विद्यार्थी सुधारित शेतीविषयक माहिती , शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत धुळे कृषि महाविद्यालय याचे प्रदीप सुरेश काकडे हे कृषि दुत वडापुरि गावामध्ये दाखल झाले आहेत. हे कृषि दुत अंतिम वर्षातील विद्यार्थी असून ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत वडापुरी गावातील पीक लागवड शेती प्रगती पीक प्रात्यक्षिके तसेच गावातील शेता विषयक प्रश्र्न जाणून घेणार आहेत .
या विद्यार्थ्यांनी वडापुरी गावामध्ये चंदू बाळू जाधव या शेतकऱ्याच्या शेती बांधावर जाऊन " मके वरील लष्करी आळीचे व्यवस्थापन व नियंत्रण कशे करावे ? याची माहिती दिली. या प्रात्यक्षिकात गावातील प्रगतशील शेतकरी शत्रूघ्न बागल,सचिन जाधव, ओंकार कदम,विठ्ठल बागल,शुभम कदम,शुभम काकडे व चंदू जाधव हे उपस्थित होते.त्यानंतर अब्दुल गणी मुलानी यांनी कृषी दुता चे आभार मानले.
धुळे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सी. डी . देवकर, डॉ. संदीप पाटील, डॉ .धीरज कणखरे , डॉ. सुनील पाटील , डॉ. आर व्ही पाटील ,डॉ. सोनवणे सर . व सर्व विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे कृषि दुत कार्यानुभवाच्या कार्यक्रम राबणार आहेत.
टिप्पण्या