इंदापुर: जय जिजाऊ,मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड पुणे शहर,जिल्हा,तालुका पातळीवर बांधणी करायची आहे..जय जिजाऊ मैत्रिणींनो, जिजाऊ महिला गृह उद्योग समूह याची सुरुवात आपण केली आहे. महिला सक्षमीकरण यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहोत. आपल्या सर्वांच्या साथीने आपण स्वतःहून आर्थिक सक्षम होण्यासाठी पुढे यायचे आहे. कारण या प्रकल्पातून आपण भविष्यामध्ये महिला उद्योजक तयार करणार आहोत,आसे मत प्रा.जयश्री गटकुळ यांनी व्यक्त केले , पुणे जिल्हा जिजाऊ ब्रिगेड अंतर्गत कार्यरत राहुन पिडित -अन्यायग्रस्त महिला भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमा अंतर्गत विधायक कार्य करण्यासाठी, नव्या युवा पिढीला प्रोत्साहन-प्रेरणा देण्यासाठी, प्रगल्भ-प्रभावी वक्तृत्व , हिम्मतवान, कणखर,लढवय्या, निर्भीड,अभ्यासू, कर्तृत्ववान अशा महिला भगिनींना समाजात उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी, जिजाऊ ब्रिगेड महिला संघटन मजबूत करण्यासाठी आपली साथ हवी आहे.....आपण, आपल्या मैत्रीणी महिला नातेवाईक या क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असाल तर संपर्क साधावा..असे आवाहन
प्रा.डाॅ.जयश्री भास्कर गटकुळ, जिजाऊ ब्रिगेड पुणे(पूर्व) जिल्हा अध्यक्षा. मु.पो-इंदापूर जि.- पुणे
मो.9423406167 यांनी केले आहे,
टिप्पण्या