इंदापुरः तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दर वर्षीप्रमाणे प्रशासकीय कार्यालयामध्ये श्रीगणेशाची स्थापना करणेत आलेली असून आज सायं. 5 वाजता महाराष्ट राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी तथा कारखान्याचे आदरणीय चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो यांचे शुभहस्ते श्रीगणेशाची आरती संपन्न झाली. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. तसेच काल दि. 25 ऑगस्ट रोजी कारखान्याच्या व्हाईस चेअरमनसो मा.श्रीमती पद्माताई भोसले यांचे शुभहस्ते गणेशआरती संपन्न झाली.
यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री. हर्षवर्धनजी पाटील यांनी वैश्विक महामारीचे आपले देशावरील व महाराष्टावरील कोरोनाचे आलेले संकट लवकरात लवकर जावो आणि कारखान्याचे सर्व सभासद व नागरिकांना निरोगी आरोग्य व सुखसम़ध्दी लाभू दे तसेच चांगल्या पर्जन्यमानासाठी श्रीगणरायाचरणी प्रार्थना केली.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार, सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करुन व शासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.
टिप्पण्या