इंदापूर:शहरातील राधिका गणेश उत्सव मंडळ गणपती चौक कालठण रोड इंदापूर यांच्या श्री.गणेश उत्सव मंडळाची आरती.
इंदापुर तालुक्यातील अनेक दिग्गज मंडळींच्या हस्ते करण्यात आली आहे, आजच्या आरतीचे मानकरी
मा. शिवाजीराव मखरे जिल्हा संघटक आरपीआय,
मा. संदिपान कडवळे अध्यक्ष आर.पी.आय.इंदापुर,
मा.विशाल चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते,
मा.माऊली नाचण सामाजिक कार्यकर्ते,
मा. हनुमंतजी कांबळे वंचित बहुजन आघाडी चे इंदापुर शहराध्यक्ष,
मा. हम्मीदभाई आत्तार सामाजिक कार्यकर्ते यांचे शुभ हस्ते सोमवार दिनांक ३१.०९.२०२० रोजी सायंकाळी ७.०० वाजता राधिका सेवा संस्था इंदापूर या गणेश उत्सव मंडळाच्या श्री. गणेशाची पुजा करून आरती वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.....
यावेळी पारस पाईपचे सर्वेसर्वा धर्मचंद (पप्पा)लोढा यांच्या वतीने श्री. विपुल शेठ लोढा यांच्या हस्ते सॅनिटायझर फवारणीच्या दोन मशिन या मंडळा कडे सुपूर्त करण्यात आल्या,
डाॅक्टर बाळासाहेब राऊत यांचे तर्फे ५ लिटर सॅनिटायझर , ९५ मास्क व रेस्पीरोमीटर व पराग मेडिकल तर्फे संदिपशेठ पांढरे यांच्याकडून ५०० मास्क श्री राधिका गणेश उत्सव मंडळास सप्रेम भेट देण्यात आले,
या सर्वांचे राधिका सेवा संस्थेचे वतीने जाहिर आभार मानन्यात आले,आसे समाजहित उपयोगी कामे करणारे एकमेव मंडळ म्हणून या मंडळा कडे पाहिले जाते, कोरोना च्या काळात अनेक गोरगरीब जनतेच्या अन्नाची समस्या सोडविण्यासाठी या मंडळाने विविध उपाय योजना करून नविन आदर्श घडवला आहे, कोरोना हरेल भारत जिंकेल, आपण आशा समाज उपयोगी काम करणा-या मंडळांना सहकार्य करणे गरजेचे आहे,
या परिवाराच्या वतीने महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते, सभासदांचे वाढदिवस साजरे केले जातात, त्या साठी (राधिका हाॅल) या वास्तुचा वापर केला जातो, या ठिकाणी सर्वच कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पाडले जातात, अनेक सभासद व मित्र परिवार वेळोवेळी मदत करतात,असे मंडळाचे वतीने सांगण्यात आले,या मंडळांचा आदर्श इतरांनी घ्यावा,आशी सर्वत्र चर्चा आहे,
टिप्पण्या