मुख्य सामग्रीवर वगळा

डॉ. संदेश शहा यांना होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हँनिमन जीवन गौरव पुरस्कार घोषित.

इंदापूर, डॉ. संदेश शहायांज कडून 
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी च्या वतीने देण्यात येणारा होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हँनिमन जीवन गौरव पुरस्कार सन २०२५ - २६ हा इंदापूर ( जिल्हा पुणे ) येथील डॉ. संदेश शरद शहा यांना घोषित झाला आहे. .
डॉ. संदेश शहा यांनी इंदापूर शहर व पंच क्रोशीत होमिओपॅथीचा प्रचार करण्यासाठी १०० हून जास्त मोफत होमिओपॅथिक शिबिरे घेऊन ५० हजार हून जास्त रुग्णांना एक महिन्याची औषधे मोफत दिली आहेत. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना सलग तीस वर्ष त्यांनी मोफत होमिओपॅथिक औषध दान केले आहे. ग्रामीण भागात होमिओपॅथीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी ११ हून जास्त चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केले आहे. कोरोना महामारी त बेड न मिळालेल्या २२० रुग्णांना त्यांच्याच घरी विलगीकरण करून त्यांनी या औषधांचा वापर करून बरे केले आहे. एड्स झाल्यानंतर मनुष्य केवळ ५ वर्ष जगतो असा सन १९९५ च्या दशकात प्रचार सुरू असताना त्यांनी अनेक रुग्णांचे आयुष्य वाढविले आहे. हजारो रुग्णांची त्यांनी मूतखडा या आजारातून मुक्तता केली आहे. हजारो रुग्णांच्या विविध आजारांच्या शस्त्रक्रिया त्यांनी टाळल्या आहेत. 
होमिओपॅथी बरोबरच योग, शाकाहार, शेती, रक्तदान, पत्रकारिता तसेच व्यसनमुक्ती साठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. देश स्वातंत्र्य झाल्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या इंदापूर तालुक्यातील गोखळी, तरंगवाडी, विठ्ठलवाडी येथे ओढा खोलीकरण व रुंदीकरण करून या गावांची तीव्र पाणी टंचाई दूर करण्यास मदत केली आहे. त्यांनी १२०० शेतकऱ्यांना मोफत गट शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. विठ्ठलवाडी येथील ओढा खोलीकरण रुंदीकरण करण्यासाठी आलेले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सामाजिक डॉक्टर म्हणून उल्लेख करून त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.
पुरस्कार वितरण जून महिन्यात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार असल्याचे समजते.
दरम्यान राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, डॉ. संदेश शहा यांना हा पुरस्कार घोषित झाल्याने इंदापूर तालुक्याचा मानसन्मान उंचावला आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळणारे डॉ. संदेश शहा हे तालुक्यातील एकमेव डॉक्टर असून त्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात डॉ. संदेश शहा यांच्या मोफत होमिओपॅथिक शिबिराचा मी उद्घाटक म्हणून साक्षीदार आहे. डॉ. बाहुबली शहा तसेच इतर १० ते १५ डॉक्टरांचे शिबिरासाठी डॉ. संदेश शहा यांना सहकार्य होत होते. संपूर्ण राज्यात मंत्री म्हणून काम करत असताना अनेक ठिकाणी डॉ. संदेश शहा यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख होत होता. त्यांना घोषित झालेल्या या पुरस्काराचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
दरम्यान राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष दशरथ माने, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरतशेठ शहा, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने,  नगराध्यक्षा अंकिताताई शहा, शहा ग्लोबल स्कूल चे विश्वस्त मुकुंदशेठ शहा, जेष्ठ कवयित्री, साहित्यिक प्रतिभा गारटकर, तुषार रंजनकर आदींनी डॉ. संदेश शहा यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...