इंदापूर महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने भीमजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी तथागत गौतम बुद्ध ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमांना मा. डी.आर ओहोळ (राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय कर्मचारी संघ नवी दिल्ली), ॲड. राहुल मखरे (प्रवक्ता व प्रदेश सरचिटणीस,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)महाराष्ट्र राज्य, शकुंतला मखरे (अध्यक्षा,मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर) यांच्या हस्ते पुष्प /पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सामूहिक बुद्धवंदना करीत त्रिशरण,पंचशील घेण्यात आली. यावेळी प्रश्नमंजुषासह विद्यार्थ्यांनी भाषणं देखील दर्जेदार केली.विविध कार्यक्रम भीमजयंतीदिनी प्रशालेत घेण्यात आले. प्रश्नमंजुषात प्रथम आलेल्या कु.अपेक्षा नगरे (८ वी) हिस डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेले चांदीचं नाणं ॲड.समीर मखरे यांनी भेट दिलं.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, संजय कांबळे, अस्मिता मखरे, नानासाहेब चव्हाण तसेच विद्यार्थी, मुख्याध्यापक,प्राचार्य, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
टिप्पण्या