मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भीमानगर-रांजणी जिल्हा परिषद शाळेतील कामाला अखेर स्थगिती! विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी अक्षय यादव यांच्या तक्रारीची दखल

शाळेच्या वेळेत धरण विभागाचे काम बंद ठेवण्याचे उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे निर्देश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य भीमानगर, दि. २ : माढा तालुक्यातील भीमानगर-रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात उजनी धरण व्यवस्थापन विभागामार्फत सुरू असलेल्या कामामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजात आणि शिक्षकांच्या अध्यापनात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार अक्षय महादेव यादव यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत उजनी धरण व्यवस्थापन विभागाने शाळेच्या नियमित वेळेत कामकाज करू नये, तसेच सुरू असलेले काम बंद ठेवावे, असे स्पष्ट निर्देश संबंधित उपविभागाला दिले आहेत. अक्षय यादव यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात निवेदन सादर केले होते. शाळेच्या आवारात सुरू असलेल्या कामामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. या निवेदनाच्या अनुषंगाने उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तातडीने कार्यवाही करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून संबंधित विभागाला सूचना दिल्या. विभागाने दिलेल्या लेखी पत्रानुसार, शाळ...