जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर तसेच तेथील स्थानिकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील मुस्लीम बांधवांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
यावेळी वाल्हेतील शाही सुन्नी मस्जिदमध्ये जुम्माची नमाज अदा केल्यावर येथील मुस्लीम बांधवांनी हातावर काळ्या फिती बांधून पहलगाम येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या दरम्यान मौलाना मुनीर शेख म्हणाले मोहम्मद पैगंबरांनी मुस्लीम समाजाला शांततेची शिकवण दिली आहे.मात्र निष्पाप लोकांना ठार मारणे त्यांच्यावर भ्याड हल्ला करणे अशा कृत्याला इस्लाम धर्मात अजिबात थारा नाही . त्यामुळे अशा भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
याप्रसंगी चांदभाई शेख सिकंदर इनामदार आरिफ आतार असलम पठाण आयुब इनामदार असलम नदाफ आयान आतार इर्शाद तांबोळी इरफान आतार अलतमश तांबोळी मुबारक इनामदार शकुर शेख अक्रम इनामदार आदी मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.
टिप्पण्या