वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ
धार्मिक कार्यक्रमांसाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील अंबाजीच्या वाडीत श्री भैरवनाथ देवाच्या एकदिवसीय यात्रेचे आयोजन येत्या २८ एप्रिल रोजी करण्यात आल्याची माहिती वाल्हे ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच यात्रा महोत्सवाचे नियोजक अमोल पवार यांनी दिली.
यावेळी यात्रेनिमित्त सोमवार
(दि .२८ एप्रिल) रोजी पहाटे श्री. भैरवनाथ मंदिराचा गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे. त्यांनतर मंदिरात महापुजा अभिषेक दंडवत घेणे वस्त्र अलंकार तसेच नवस व नवसाची पूर्तता अशा धार्मिक कार्यक्रमांना सुरवात केली जाणार आहे. त्यांनतर देऊळवाड्या समोर गणराज मित्र मंडळाच्या वतीने झांज पथकाचा लक्षवेधी कार्यक्रम आटोपल्यावर देवाच्या छबिन्याला सुरवात केली जाणार आहे.
या दरम्यान देवाचा भंडारा तसेच रात्रीच्या वेळी मा. हनुमंतराव देवकाते पाटील यांच्या लोकनाट्य तमाशाने या यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष दिगंबर पवार यांसह गुरुदत्त हॉटेलचे मालक पुनमशेठ पवार तसेच नवनाथ पवार हरिशचंद्र उर्फ अलबट पवार यांनी दिली.
टिप्पण्या