इंदापूर:
दि एन्व्हायरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने स्थापनेपासून निसर्गाच्या संबंधित येणाऱ्या अडीअडचणींची सोडवणूक करण्यासाठी वृक्षारोपण, संवर्धन इत्यादी कार्य केले जाते निमगाव, बिजवडी परिसरातील वन्य प्राण्यांना उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पाण्यासाठी खूप भटकंती करावी लागते ही बाब ओळखून मागील 6 वर्षापासून वन विभागाने केलेल्या छोट्या छोट्या टॅंक मध्ये पाणी सोडले जाते तसेच या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आढळत असून त्यांची तहान भागवण्यासाठी व भटकंती टाळण्यासाठी उन्हाळा पूर्ण होईपर्यंत वन्य प्राण्यांना मुबलक प्रमाणात एक प्रकारचे सामाजिक कार्य म्हणून पाणीपुरवठा करीत असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र माने देशमुख यांनी दिली. यावेळी असोसिएशनने जोपासलेल्या सामाजिक उपक्रमाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तोंड भरून कौतुक केले
याप्रसंगी असोसिएशनचे संचालक श्री मुकुंद घारगे, श्री राजेन्द्र कुमार गोफणे, सचिव श्री संतोष कुमार गव्हाणे, प्रगतशील बागायतदार श्री अण्णासाहेब गटकुळ, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री अजित सूर्यवंशी वन रक्षक श्री तुकाराम बादने, सहाय्यक वनरक्षक श्री बाळासाहेब वाघमोडे त्याचबरोबर श्री बाळासाहेब शिंगाडे व श्री गजानन बोडके उपस्थित होते
टिप्पण्या