वाल्हे (ता. पुरंदर ) नगरीत विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी पहाटेपासूनच मारुती मंदिरात भाविकांनी उत्सवमूर्तींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.
वाल्हे गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेला लवकरच सुरवात होणार असल्याने गावात आत्तापासूनच भाविकांची रेलचेल सुरु झाली आहे.त्यातच बजरंगबलीच्या जन्मवेळेचा मुहूर्त पहाटे ६ वा.१९ मिनिटांचा असल्याने भल्या पहाटे उत्सवमूर्तीना पंचामृताने शाही स्नान घालण्यात आले. त्यानंतर रुद्राभिषेक आरती व इतर धार्मिक कार्यक्रमांना सुरवात करण्यात आली. यावेळी उत्सवमूर्तींच्या जन्मोत्सवा नंतर सामाजिक कार्यकर्ते नाना दाते यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आल्याने भाविकांमध्ये कमालीचा उत्साह जाणवत होता.
या सोहळ्यासाठी मंदिराचे पुजारी सचिन आगलावे यांसह हरिभाऊ पवार विलास लंबाते सविता भुजबळ नितीन भुजबळ सुदाम भुजबळ विनोद पवार तुषार भुजबळ प्रवीण भुजबळ निलेश कुदळे पुरोहित सचिन देशपांडे सतीश कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या