*दुर्मिळ युरेशियन कोट प्रजातीच्या पक्षाचे प्राण श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे वाचले.*
इंदापूर:- काल रात्री शुभम धारूरकर याचा मला फोन आला दादा दत्त मंदिराजवळ परदेशी यांच्या बांधकामातील टाकीत दोन दिवसापासून एक पक्षी पडलेला आहे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमातून हा वेगळा पक्षी वाचवण्यासाठी त्वरित मी त्या ठिकाणी पोहोचलो आमचे मित्र पक्ष मित्र वेदांत घोरपडे याला फोन करून त्या ठिकाणी बोलून घेतलं सात ते आठ फूट खोल अशा टाकीत तो बक्षी वारकरी किंवा युरेशियन कूट पडलेला होता मदत करायला गेल्यास तो घाबरून त्याच्या मोठ्या चोचीने आणि बळकट नक्यांनी हल्ला करीत होता वेदांत नाही ग्लोज घालून त्याला पकडलं आणि माझ्या जवळच्या बास्केटमध्ये त्याला ठेवण्यात आला.
उत्तरेकडे थंडी वाढली की हिवाळ्यात भारतात अनेक स्थलांतर करणारे पक्षी येतात. अशा पक्ष्यांपैकी एक अतिशय सामान्य आणि सहज ओळखता येणारा पक्षी आहे युरेशियन कूट. ह्याला मराठीत वारकरी असं नाव ठेवण्यात आलं आहे. असं नाव ठेवण्याचं कारण तो पक्षी पाहताच लक्षात येतं. मुख्यतः काळ्या रंगाच्या ह्या पक्ष्याचा कपाळावर किंवा डोक्याच्या पुढच्या बाजूला पांढर्या रंगाचा मोठा ठिपका असतो, अगदी पांढरी टोपी लावल्यासारखा.युरेशियन कूट किंवा वारकरी, मोठ्या संख्येने हिवाळ्यात पूर्व युरोप तसेच भारताच्या उत्तरेकडील भागांमधून दक्षिणेला येतात. हिवाळ्यात हिमालय आणि त्याच्या उत्तरेकडील भागात तापमान खूप खाली जाते, काही ठिकाणी पाणी थिजते, तसेच पुरेसे खाद्य नसते. त्यामुळे हे स्थलांतर करतात. एका प्रकारे नियमित वारीवर जातात. काही युरेशियन कूट मात्र वर्षभर भारतातच राहतात, विशेषतः अशा ठिकाणी जिथे तलावांमध्ये वर्षभर पाणी आणि वनस्पती उपलब्ध असतात अशा ठिकाणी ते सर्व ऋतूंमध्ये दिसतात. दुरून एखाद्या बदकाप्रमाणेच दिसणारा हा पक्षी पाणकोंबड्यांचा जास्त जवळचा नातलग. जमिनीवर चालत असताना ते अगदी कोंबडी सारखेच वाटतात. बर्याचदा बदकांसह ते मोठ्या गटात तलावांमध्ये किंवा इतर पाणथळ जागी पोहताना आढळतात. त्यांचे पाय पोहताना पाण्याखाली असल्यामुळे नीट दिसत नाहीत, पण ते जमिनीवर, तलावाच्या काठी आले तर हे लक्षात येते की त्यांचे पाय बदकांपेक्षा थोडे वेगळे आहेत.
श्री श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळ इंदापूर खडकपुरा येथील कार्यकर्ते सोमनाथ खंडागळे निखिल महाजन अक्षय परदेशी अमोल परदेशी शुभम धारूरकर श्याम काका महाजन
वरद महाजन बापू वाघमारे यांनी वेळेत माहिती दिल्यामुळे या दुर्मिळ जातीच्या पक्षाचे प्राण वाचवण्यास काल आम्हाला यश आले वेदांत ने फॉरेस्ट ऑफिसर बधे साहेब यांच्या हवाली त्या पक्षाला रात्रीत केले.
बरोबर आणि त्याचे मित्र यांच्या सतर्क ते मुळे एका निष्पाप शिवाचा भटकते कुत्र्यापासून प्राण वाचवण्यात आम्हाला यश आले.
चांगलं काम करताना बरेच जण तुमचं कौतुक करतात आणि याच्या उलटी असतं टीका आणि स्तुती याच्यापासून जो वाचतो विचलित होत नाही तोच या मार्गाने पुढे चालू शकतो गेली 14 वर्ष युवा क्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा रस्ता निवडलेला आहे तू खरं तर खडतर आहे पण मानसन्मान मिळवून देणार आहे त्यापेक्षाही आत्मिक समाधान मिळवून देणार आहे म्हणतात लोक देवालाही नाव ठेवतात त्यामुळे आपलं काम करत राहायचं एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र
हर हर महादेव प्रशांत उषा भानुदास शिताप
21 एप्रिल 25
टिप्पण्या