इंदापुरात गुटख्याचा 'दिवाळी धमाका': एफडीए झोपेत, पोलिसांचे 'लाडके पंटर' थेट ठाण्यातच तैनात; रस्त्यांवर मात्र रंगीबेरंगी 'चित्रकला'!
इंदापूर: इंदापूर तालुक्यात सध्या एका नव्याच कलेला उधाण आलं आहे! शहर असो वा ग्रामीण भाग, रस्त्या-रस्त्यावर, भिंतींवर आणि चौकाचौकांत तांबड्या-लाल रंगाच्या अशा काही 'पिचकाऱ्या' मारल्या जात आहेत की, परदेशी चित्रकारही ही रंगीबेरंगी 'आर्ट' पाहून चक्रावून जातील! अपवादात्मक दोन-चार कोपरे सोडले, तर संपूर्ण तालुक्यात गुटख्याची विक्री अगदी खुलेआम, दिमाखात आणि ढोल-ताशांच्या गजरासारखी सुरू आहे. पण, समाजसुधारणेच्या आणि धडक कारवाईच्या बाता मारणारे एफडीए खाते (आणि त्यांचे प्रमुख तुकाराम मुंढे साहेब) नेमके कुठल्या गाढ झोपेत आहेत, असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. ‘गोतामे’ फुल्ल अन् दिवाळी धमाका! सध्या सण-उत्सवाचे दिवस नसले तरी इंदापुरातील गुटखा माफियांसाठी रोजच 'दिवाळी धमाका' सुरू आहे. गुटख्याचे गोडाऊन म्हणजेच 'गोतामे' काठोकाठ भरून वाहत आहेत. सरकारबंदीचा कागदी वाघ दाखवला जातोय, पण प्रत्यक्षात मात्र "खिशाला द्या मलिदा, अन् गुटखा न्या फायदा" असाच काहीसा कारभार सुरू आहे. पोलीस अन् 'पंटर': हे नातं काय म्हणायचं? सर्वात रंजक आणि चकीत...