मुख्य सामग्रीवर वगळा

जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ पुणे सकल जैन समाजाचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन,

इंदापूर, डॉ. संदेश शहा.
बृहन्मुंबई महापालिकेने मुंबईतील विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर बुलडोझरच्या सहाय्याने बेकायदेशीर रित्या उध्वस्त केल्याच्या निषेधार्थ हजारो पुणे सकल जैन समाजाच्या वतीने दि. २२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जैन समाजातील हजारो स्त्री-पुरुषांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. न्यायालयाचा आदेश झाला नसताना देखील मनमानी पद्धतीने मंदिर पडणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, उध्वस्त केलेल्या मंदिराचे त्याच जागेवर पुनर्निमाण व्हावे या प्रमुख मागणीचे पत्र पुणे सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने दि. १६ एप्रिल रोजी विलेपार्ले येथील जैन मंदिर सर्व कायदेशीर बाबी समजून न घेता बृहन्मुंबई महापालिके तर्फे अत्यंत क्रूर पद्धतीने बुलडोझर व जेसीबीच्या सहाय्याने मंदिर उध्वस्त करण्यात आले. मंदिर पाडताना तेथील धार्मिक ग्रंथ, पूजा साहित्य तसेच तीर्थंकर प्रतिमेची देखील विटंबना करण्यात आली. प्रशासनाच्या या जुलमी कारभारामुळे देशातील समस्त जैन धर्मिय समाज अत्यंत आक्रोशित झाला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्या लक्षात आणून देण्यात आले. निषेधाचे निवेदन सकल जैन समाजाच्या वतीने अचल जैन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले. जैन समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत निश्चित पोहोचविण्याचे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी प्रतिनिधींनी दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून जैन तीर्थस्थळांवर सुरू असलेले अतिक्रमण, यात्रेकरू तसेच जैन गुरू, साधू, साध्वी यांच्यावर होणारे हल्ले, जैन धर्मावर, समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी सकल जैन संघ चिंतीत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. 
राज्य,देशातील सर्व जैन धर्मीय तीर्थक्षेत्रे, मंदिरे,
स्थानक, उपाश्रय, साधू, साध्वींचे निवासस्थान अशा सर्व धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी सुरक्षा सुनिश्चित करणारा कायदा व्हावा, जैन धर्मिय साधू-साध्वी संतविहार करताना संपूर्ण वेळ सरकारच्या वतीने त्यांना संरक्षण देण्यात यावे, जैन धर्मियांची अत्यंत प्राचिन व हजारो वर्षांची परंपरा असलेल्या विविध तीर्थक्षेत्रांवर जसे, पालिताना, गीरनार, समेद शिखरजी, राजगृही, राणकपुर तसेच अन्य ठिकाणी पूजा-भक्ती करण्यापासून विविध समाजकंटकां कडून रोखले जात आहे त्याबाबत केंद्र सरकारच्या माध्यमातून कारवाई होऊन जैन धर्मियांना संरक्षण मिळावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनाच्या सुरुवातीस व शेवटी नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले.
यावेळी मिलिंद फडे म्हणाले, मुंबईतील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ सर्व समाज बांधव एकत्र झाले आहेत याचा आनंद असून आपण सर्वांनी संघटित होऊन अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे.
अचल जैन म्हणाले, समाजाच्या भावना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविणार आहोत. समाजाच्या भावनांचा जर विचार झाला नाही, न्याय मिळाला नाही तर पुढील भूमिका आपण सर्वसमावेशक पद्धतीने ठरवू.
यावेळी युवराज शहा, अभय छाजेड, प्रविण चोरबेले, सुरेखा शहा, अजित पाटील, इंद्रकुमार छाजेड, प्रिती पाटील, सुरेश शहा, लक्ष्मीकांत खाबिया, सुरेंद्र गांधी, संपत जैन, सतीश शहा, समीर जैन, नितीन जैन, भरत सुराणा, अॅड. योगेश पांडे, अभय जैन, अल्पेश गोग्री, प्रीतम मेहता यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी निषेधात्मक भावना व्यक्त करत आंदोलनाला पाठींबा दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...

चलो हिंगणगाव!" उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न? उद्या प्रशासनाविरुद्ध एल्गार!

इंदापूर/हिंगणगाव उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनींवर प्रशासनाकडून बळजबरीने ताबा मिळवण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप करत, उद्या हिंगणगाव येथे शेतकरी एकत्र येऊन प्रशासकीय हुकूमशाहीविरुद्ध तीव्र संघर्ष पुकारणार आहेत. " शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, एकजुटीची ताकद!" या घोषणेसह उद्या, गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता हिंगणगाव येथील 'मच्छबीज केंद्र' येथे मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणगाव येथील मूळ उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन, हुकूमशाही पद्धतीने आणि प्रशासनाचा वापर करून बळजबरीने मोजणी करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे स्थानिक धरणग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. "पिढ्यानपिढ्या ज्या जमिनींवर शेतकऱ्यांचा हक्क आहे, त्या जमिनी प्रशासन सालगड्यासारखा वापर करून हिरावून घेऊ पाहत आहे," असा संताप आंदोलक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या अन्यायाविरुद्ध हिं...