इंदापूर काल नेहमीप्रमाणेच संध्याकाळी साडेआठ नऊ नंतर इंदापूर बस स्टॅन्ड हळूहळू शांत होत होतं दिवसभरांची लगबग गाड्यांची वर्दळ विद्यार्थी प्रवासी सुट्टीला आलेले,सुट्टीला जाणारे प्रवासी ड्रायव्हर कंडक्टर बस चे हॉर्नचा आवाज विक्रेत्यांच्या आरोळ्या यातून शांत शांत होत आयुष्याच्या उतर्तीच्या टप्प्यावर जसा आपण निवांत बसलेलो असतो त्याच पद्धतीने दमलेलं थकलेलं भागलेलं एसटी स्टँड शून्यात नजर हरवून बसलेला होता शेवटची बसची वाट पाहणारी मावशी तिची दोन लेकरं आता शेवटची बस हुकली म्हणून तिथेच कुठेतरी कोपऱ्यात पथहरी हाथरून आजची रात्र काढण्यासाठी झोपलेले प्रवासी यांची बस चुकली आहे पण उद्या सकाळी बस आहे हे एकीकडे आणि सार्वजनिक शौचालयाच्या कोपऱ्या दूरवर त्यांचे आयुष्याची बस चुकली आहे. नातीगोती जवळची माणसं आपली माणसं हरवलेल्या, बस स्टँड वर चुकलेल्या कावर बावर झालेल्या लहान लेकरासारखी आयुष्याच्या शेवटी एकाकी पडलेली. डेपोत धक्क्याला लागलेल्या जीर्ण जुन्या बसेस सारखे किंवा जबरी अपघात होऊन भंगार अवस्थेत पडलेल्या वाहना सारखी दुर्लक्षित, नकोशी अडगळीची झालेली दहा पाच वर्ष महिने लांबलेलं नको...
SHIVSRUSTHI NEWS