महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग व राष्ट्रीय सरपंच संसद च्या माध्यमातून करणार हजारो झाडांचे वृक्षारोपण -अनिताताई खरात
बुधवार दिनांक 9/10/2024 रोजी दुपारी 12.30 वाजता वृक्षारोपण महायज्ञ हा कार्यक्रम पार पडणार आहे, महाराष्ट्र शासन सामाजिक विभाग व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंट अंतर्गत राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींना पहिल्या टप्प्यात 500 व दुसऱ्या टप्प्यात 500 असे मिळून 1000 झाड वाटप करण्यात येणार आहे यानिमित्त 15 ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामसेवकांना वृक्षारोपण संदर्भात माहिती व वृक्ष देण्यासंदर्भातील पत्र बुधवारी 9/10/2024 रोजी दुपारी 12.30 वाजता हॉटेल स्वामीराज येथील सभागृहात देण्यात येणार आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवड अतिशय महत्त्वाची आहे, तसेच त्या वृक्षांचे संवर्धन ही महत्त्वाचे आहे या सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रीय सरपंच संसदेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींना दोन टप्प्यात 15000 वृक्ष देऊन वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे यासाठी प्रमुख मान्यवर कार्यक्रमाच्या उद्घाटक श्रीमती .आशा भोंग विभागीय वन अधिकारी सामाजिक विभाग पुणे या उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे तसेच गटविकास अधिकारी सचिन खुडे , योगेशजी पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रीय सरपंच संसद प्रकाशजी महाले उपाध्यक्ष व समन्वयक राष्ट्रीय सरपंच संसद व प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राष्ट्रीय सरपंच संसद समन्वयक इंदापूर चे महेंद्र दादा रेडके व महिला समन्वयक अनिताताई खरात यांनी दिली.
टिप्पण्या