मुख्य सामग्रीवर वगळा

*इंदापूरात शेवटची गाडी चुकलेल्यांची दिवाळी दुर्लक्षितांची दिवाळी.*..

 इंदापूर काल नेहमीप्रमाणेच संध्याकाळी साडेआठ नऊ नंतर इंदापूर बस स्टॅन्ड हळूहळू शांत होत होतं दिवसभरांची लगबग गाड्यांची वर्दळ विद्यार्थी प्रवासी सुट्टीला आलेले,सुट्टीला जाणारे प्रवासी ड्रायव्हर कंडक्टर बस चे हॉर्नचा आवाज विक्रेत्यांच्या आरोळ्या यातून शांत शांत होत आयुष्याच्या उतर्तीच्या टप्प्यावर जसा आपण निवांत बसलेलो असतो त्याच पद्धतीने दमलेलं थकलेलं भागलेलं एसटी स्टँड शून्यात नजर हरवून बसलेला होता शेवटची बसची वाट पाहणारी मावशी तिची दोन लेकरं आता शेवटची बस हुकली म्हणून तिथेच कुठेतरी कोपऱ्यात पथहरी हाथरून आजची रात्र काढण्यासाठी झोपलेले प्रवासी यांची बस चुकली आहे पण उद्या सकाळी बस आहे हे एकीकडे आणि सार्वजनिक शौचालयाच्या कोपऱ्या दूरवर त्यांचे आयुष्याची बस चुकली आहे. नातीगोती जवळची माणसं आपली माणसं हरवलेल्या, बस स्टँड वर चुकलेल्या कावर बावर झालेल्या लहान लेकरासारखी आयुष्याच्या शेवटी एकाकी पडलेली.
 डेपोत धक्क्याला लागलेल्या जीर्ण जुन्या बसेस सारखे किंवा जबरी अपघात होऊन भंगार अवस्थेत पडलेल्या वाहना सारखी दुर्लक्षित, नकोशी अडगळीची झालेली दहा पाच वर्ष महिने लांबलेलं नकोस झालेला आयुष्य जगणारी मग कोणी अपंग असेल ,एकाकी असेल ,व्यसनी असेल दिवसभर इंदापूरच्या बाजारपेठेत मिळेल ते मागायचं खायचं आणि परमेश्वराने वाढवून दिलेलं आयुष्य जगायचं अशी ही वाऱ्यावर जगणारी वयस्कर अपंग परमेश्वराची लेकरं झोपेला अंगाई गीत गात दुःखाची चादर ओढून सुखाची स्वप्न पाहत झोपायचं प्रयत्न करणारी काही अभागी ..
खिशात पैसे नाहीत म्हणून चालत्या बस मधून कंडक्टरने उतरून द्यावा तसं संसाराच्या प्रवासात निरोपयोगी नकोसा झालेले या लोकांना घरच्यांनी आपल्यांनी उतरवुन दिलेलं असतं 
दरवर्षी दुर्लक्षतां च्या दिवाळीत यांना भेटून
त्यांना दिवाळीचा फराळ देऊन शुभेच्छा देऊन घरी जाणार का काही काम करणार का काही मदत हवी का आरोग्याच्या काहीच समस्या आहेत का किंवा स्टँडवर कोणी त्रास देते का याची चौकशी करतो.
 धकाधकीच्या जीवनात आपणही आता फुलबाजी वाजवायला विसरतो काल त्यांच्या हातात फुलबाजे देऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यात टिप ताना जे समाधान मिळाले जे सुख मिळाले ते शब्दातीत आहे 

युवाक्रांती प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी न चुकता या निराधार अनाथ वृद्ध लोकांना दीपावली शुभेच्छा देताना मी मनात विचार करतो यांची चुकलेली गाडी यांना परत मिळेल का? खरतर हे एक प्रकारचे वृद्धाश्रमच आहेत फरक येवदाच तिथंतर लोक आपलेपणाने येतात सामाजिक क्षेत्रातील दानशूर व्यक्ती मदत करतात पण इथे फक्त प्रवासी असतात बस स्टैंड वर पुढच्या प्रवासासाठी लगबग करत असताना कोणीतरी इथ राहिलेय चुकलय थांबलय वाट बघतोय हा विचारच मनात येत नाही म्हणून तर ही आगळी वेगळी दिवाळी या शेवटची एसटी चुकलेला लोकांसाठी 
युवा क्रांती प्रतिष्ठानचे एडवोकेट मोरेश्वर कोकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल दिवाळी अगोदरची दिवाळी या लोकांसोबत साजरी केली


 दुर्लक्षतांची दिवाळी दुसरे चरण संपन्न

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...