*अॅड. राहुल रत्नाकर मखरे यांची महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी च्या सरचिटणीस व प्रवक्ते पदी निवड झाल्याबद्दल सन्मान*
इंदापूर:- अॅड. राहुल मखरे यांची , महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस व प्रवक्ते पदी निवड करण्यात आली नुकतीच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत राजाराम पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.सामाजिक, शैक्षणिक व इतर लोकोपयोगी क्षेत्रामध्ये आजवर दिलेले योगदान लक्षात घेऊन राहुल मखरे यांची निवड सार्थ करण्यात आली. त्यांचा सन्मान भावी आमदार आप्पासाहेब जगदाळे व दमदार नेतृत्व मा.भरतशेठ शहा यांचे हस्ते करण्यात आला या वेळी बापूराव जामदार निरा भिमा सह.साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे,वसंत मोहोळकर,कर्मयोगी सह.साखर कारखान्याचे संचालक रविंद्र सरडे,सुनील तळेकर,सह इतर मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या