मुख्य सामग्रीवर वगळा

*बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्र सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा स्तरीय कायाकल्प पुरस्काराचा मानकरी*

इंदापूर, डॉ. संदेश शहा.
महाराष्ट्र राज्य आयुक्त, आरोग्य सेवा आणि अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र राज्य गुणवत्ता आश्वासन कक्ष आणि जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने बिजवडी ( ता. इंदापूर, जि. पुणे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास सलग दुसऱ्या वर्षी आरोग्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल कायाकल्प पुरस्काराने गौरविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांनी दिली. 
 माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते विधीज्ञ राहुल मखरे यांनी सलग दुसऱ्यांदा हा मानाचा पुरस्कार प्राप्त केल्या बद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुश्रुत शहा व सर्व सहकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून अभिनंदन केले. 
मुळात स्वच्छ वातावरणामुळे आरोग्य सुधारते आणि रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते, तसेच आरोग्य सुविधेतील रुग्णांचा अनुभव वाढतो म्हणून तत्कालीन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी १५ मे २०१५ रोजी ' स्वच्छ भारत मिशन 'चा विस्तार म्हणून 'कायाकल्प पुरस्कार योजना सुरू केली. रोख रक्कम रुपये ५० हजार, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. देशातील सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि संसर्ग नियंत्रण पद्धती सुधारणे आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुविधांना प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, डॉ. वामन गेंगजे, डॉ. बालाजी लकडे, डॉ. सचिन एडके, डॉ. अभय तिडके, प्रमोद गायकवाड, रुपाली केजकर यांच्या मार्गर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आदर्श कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याची भावना डॉ. सुश्रुत शहा यांनी यावेळी व्यक्त केली. 
याप्रसंगी डॉ. समता सरवदे, प्रवीण क्षिरसागर, देवेंद्र उत्तेकर, बनसिद्ध कुंभार, बालाजी गडदे, सुलभा काळे, रिजवाना तांबोळी, प्रतिक लोंढे, अतुल तोंडे, संदीप रायपूरे, आनंद लांडगे, प्रवीण पोंदकुले, शिवाजी गोळे, प्रदिप गोलांडे, रेणुका जाधव व सर्व सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा पुरस्कार मिळाल्याचे डॉ. सुश्रुत शहा यांनी सांगितले.  
इंदापूर तालुक्यातील बिजवडी सोबतच निरवांगी, लासुर्णे, पळसदेव, निरनिमगाव, काटी येथील आरोग्य केंद्रांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, विस्तार अधिकारी संतोष बाबर, सचिन जाधव यांनी समाधान व्यक्त केले तसेच इतर आरोग्य केंद्रांनीही यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रास देश पातळीवरील सर्वोच्च पुरस्कार मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व कटिबध्द असल्याचे शेवटी डॉ. सुश्रुत शहा यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...