'*राष्ट्रीय सरपंच संसद' आणि 'महाराष्ट्र शासन - सामाजिक वनीकरण विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने संयोजित 'वृक्षारोपण महायज्ञ' उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*
इंदापूर'एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट' अंतर्गत स्थापित 'राष्ट्रीय सरपंच संसद' आणि 'महाराष्ट्र शासन - सामाजिक वनीकरण विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यात 'वृक्षारोपण महायज्ञ' संयोजित करण्यात येत आहे.
राष्ट्रीय सरपंच संसदे' चे सदस्य असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील 351 तालुक्यातील 3400 ग्रामपंचायत गावांत 'वृक्षारोपण महायज्ञ' उपक्रमांतर्गत 34 लक्ष वृक्षरोपांची लागवड करण्यात येत आहे.
पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने सरपंचांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वीपणे साकारत आहे.
'वृक्षारोपण महायज्ञ' उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहरात हॉटेल स्वामीराजच्या सभागृहात बुधवार दि.09 ऑक्टॉबर 24 रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय सरपंच संसदे' चे कार्याध्यक्ष व प्रमुख समन्वयक,श्री.योगेशजी पाटील, उपाध्यक्ष व सहसमन्वयक ,श्री.प्रकाशराव महाले, इंदापूर चे नायब तहसीलदार श्री.विजय घुगे,महसूल सहाय्यक श्री.राहुल पारेकर, वनाधिकारी श्रीमती अर्चना कवितेके पोलिस अधिकारी श्रीमती माधुरी लडकत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
'राष्ट्रीय सरपंच संसदे' चे इंदापूर तालुका समन्वयक श्री.महेंद्र रेडके व
इंदापूर तालुका महिला समन्वयक सौ.अनिताताई नानासाहेब खरात हे या कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक होते. इंदापूर राष्ट्रीय सरपंच संसद चे सदस्य श्री.अतुल शिंगाडे, श्री.शिवकुमार गुणवारे व सौ.अनिताताई ताटे यांचे या संयोजनासाठी त्यांना सहकार्य मिळाले.
राष्ट्रीय सरपंच संसदे' चे सदस्य असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील सरपंचांना वृक्षारोपे वितरणपत्र कार्यक्रम चे अध्यक्ष व राष्ट्रीय सरपंच संसदेचे कार्याध्यक्ष व प्रमुख समन्वयक, श्री.योगेशजी पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
.छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. सौ.अनिताताई खरात यांनी सर्वांचे स्वागत केले. श्री.महेंद्र रेडके यांनी प्रास्ताविक केले.
इंदापूरचे नायब तहसीलदार श्री.विजय घुगे,श्रीमती माधुरी लडकर,श्रीमती अर्चना कवितेके, श्री.प्रकाशराव महाले व कार्यक्रम चे अध्यक्ष श्री. योगेशजी पाटील यांनी मार्गदर्शन केले
.इंदापूरचे सामाजिक कार्यकर्ते श्री. निलेशजी धापटे यांनी सुत्रसंचलन केले.इंदापूर तालुक्याचे राष्ट्रीय सरपंच संसदेचे सदस्य श्री.नानासाहेब खरात यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता झाली.
यावेळी अमर भैया जगदाळे, दीपिकाताई शिरसागर, गणेश लंबाते, भाग्यश्री बोडके,लक्ष्मण वाघमोडे,दिलीप पाटील, पोपट पवार,अमोल इंगळे,राजेश पवार, सद्दाम बागवान, मनीषा वाघ, शकुंतलताई जगताप, माधुरी जगताप, संदीप रेडके,गणेश शिंगाडे, दत्ता पांढरे, महादेव पांढरे,विशाल म्हेत्रे, अण्णा गायकवाड,सोनू सय्यद, गौरव राऊत,अरबाज बागवान,सोनाली बोडके, निर्मला जाधव, रेश्मा शेख ,नारायण हरणावळ रुपेश वाघमोडे, अभिजीत रेडके व इतर मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय सरपंच संसदचे इंदापूर तालुक्याचे समन्वयक, तालुक्यातील सरपंच व उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व इंदापूर चे ग्रामस्थ, इंदापूर तालुक्यातील सरपंच मोठया संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
.'वृक्षारोपण महायज्ञ' उपक्रम आयोजनाविषयी 'राष्ट्रीय सरपंच संसदे' चे अभिनंदन करून सर्व अधिकाऱ्यांनी, 'राष्ट्रीय सरपंच संसदे'च्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी इंदापूर येथे वृक्षारोपण केले.
टिप्पण्या