वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ
पुरंदर हवेली मतदार संघात महायुती व महाविकास आघाडीच्या पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जेजुरी येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश जगताप यांना उमेदवारी जाहिर करण्यात आल्याने मनसेच प्रचाररूपी इंजिन या मतदार संघात लवकर धडाडताना दिसणार आहे.
गेल्या पंचवीस वर्षापूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी श्रीक्षेत्र जेजुरीत रिक्षा व्यवसाय करणाऱ्या उमेश जगताप यांना सामाजिक कार्यासह प्रामाणिकतेच्या जोरावर महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून चक्क विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांची उमेदवारी या मतदार संघातील चुरशीच्या लढतीत भल्या भल्यांना घाम फोडणार असल्याचे मानले जात आहे.
यापूर्वी उमेशजी जगताप यांनी सामाजिक भावनेतून आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कित्येक वर्ष पुरंदर तालुक्यातील शालेय विध्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून समाजात आगळा वेगळा आदर्श निर्माण केला होता.त्यातच जेजुरीच्या खंडोबा नगरीत देखील त्यांनी अनेक वर्षापासून सलग दहीहंडी उत्सव साजरा करून गरजू व निराधार वर्गाला मदतीचा हात देखील पुढे केला होता.
अशातच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच दुष्काळग्रस्तांना चारा वाटप तसेच अपघात ग्रस्तांसह पूरग्रस्तांना देखील मदत केल्याने उमेशजी जगताप यांच्या नावाची कीर्ती पुरंदर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे.
त्यातच उमेश जगताप यांनी जेजुरी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या तमाम कामगारांना हाताशी धरून त्यांच्या अडी अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी मनसे स्टाईल ने आंदोलनं देखील केली.म्हणूनच पक्ष श्रेष्ठींनी देखील त्याना महाराष्ट्र नव निर्माण सेनेच तालुकाध्यक्ष पद देखील बहाल केल होते .
मात्र त्यांच्या वाढत्या समाज कार्याची दखल घेऊनच मनसेचे नेतेअनिलजी शिदोरे बाबूजी
वागसकर माजी आमदार बाळा नांदगावकर प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुधीरजी पाटसकर पुणे जिल्हाध्यक्ष पोपट सूर्यवंशी यांसह आदी दिग्गज मान्यवरांनी पुरंदर हवेली मतदार संघातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेशजी जगताप यांच्या नावाची शिफारस केल्याची चर्चा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे .
याबाबत मनसेचे अधिकृत उमेदवार उमेश जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपला उमेदवारी अर्ज येत्या २९ तारखेला दाखल करणार असल्याचे सांगितले तर पुरंदर हवेली मतदार संघातील तमाम जनतेच्या अडी अडचणी सोडवण्यासह बेरोजगार भूमीपुत्रांना देखील रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने पाऊले उचलली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
*पुरंदरच्या धर्तीवर राज ठाकरे अवतरणार*
पुरंदर हवेली मतदार संघातील अडी-अडचणी जाणून घेण्यासह राजकीय विचारधारेला अनुसरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुरंदर तालुक्यात लवकरच जाहिर सभा होणार असल्याची माहिती उमेश जगताप यांनी दिली.
टिप्पण्या