•इंदापूरात गर्दीचा नवा विक्रम प्रस्थापित होणार
राज्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमधील प्रवेश सोहळा सोमवारी (दि. 7) सकाळी 10 वा. संपन्न होत असून, हा सोहळा ऐतिहासिक व इंदापूर तालुक्यातील गर्दीचा नवा विक्रम प्रस्थापित करणारा ठरणार आहे. या पक्ष प्रवेश सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, राजवर्धन पाटील यांनी रविवारी सायंकाळी सभा स्थळाची पाहणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार्या या पक्ष प्रवेश सोहळ्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा.सुप्रियाताई सुळे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खा.अमोल कोल्हे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ. रोहित पवार व पक्षातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे. या पक्ष प्रवेश सोहळ्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय असणार आहे. सध्या सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, सुमारे 30 हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या पक्ष प्रवेश सोहळ्यामुळे इंदापूर तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. तरी या पक्ष प्रवेश सोहळ्यास सकाळी 10 वाजने पूर्वी नागरिकांनी सभास्थळी उपस्थित रहावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील संपर्क कार्यालय इंदापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या