मुख्य सामग्रीवर वगळा

*महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीचा पद नियुक्ती व सत्कार समारंभ संपन्न तर शिवाजी पवार यांची तालुका अध्यक्षपदी निवड*

 इंदापूर:-महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीचा पद नियुक्ती व सत्कार समारंभ सोहळा महाराष्ट्र राज्याचे जनसेवा संघटनेचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील व उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे पार पडला.यावेळी धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून संघटनेची इंदापूर तालुका पत्रकार आघाडी कार्यकारणी खालील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आली.प्रदेश उपाध्यक्ष संतोष दहिदुले
अध्यक्ष पत्रकार शिवाजी आप्पा पवार,उपाध्यक्ष बापू बोराटे,संजय शिंदे,कार्याध्यक्ष जावेद मुलाणी,सचिव सत्यजीत रणवरे,सहसचिव संतोष आटोळे,सरचिटणीस योगेश कणसे,खजिनदार गणेश कांबळे,सहखजिनदार दत्ता पारेकर तर प्रसिद्धीप्रमुख पदी अतुल सोनकांबळे यांची निवड करण्यात आली असून संघटनेच्या सदस्य पदी अमोल भोग,बापु राहिगुडे,दत्तात्रय गवळी,लक्ष्मण भिसे,महेश गडदे,संतोष भरणे,मुख्तार काझी,राहूल बोबडे,रामदास पवार,सलीम शेख,समीर सय्यद,संतोष जामदार,संतोष कदम,विशाल भोंग,शिवकुमार गुणवरे,भिमसेन उबाळे,अमोल कांबळे,बबनराव धायतोंडे,अरुण भोई,आदि पत्रकारांची निवड करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रविण माने,माजी उपनगराध्यक्ष भरत शेठ शहा,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, शिवसेना(ठाकरे गट)इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे,तालुका संघटक सुदर्शन रणवरे,महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे,तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता खरात,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सीमा कल्याणकर,इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे आदी मान्यवर उपस्थित होते.


इंदापूर पंचायत समिती येथील सभागृहात झालेल्या पदनियुक्ती कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले.यावेळी बोलताना मोहिते पाटील यांनी पत्रकारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगत पत्रकार हा समाजातील एक महत्त्वाचा घटक असून पत्रकार हा आरशाप्रमाणे असतो तो आपल्याला आपला खरा चेहरा दाखवत असतो.सध्या समाजात पत्रकारांवरती होणारे हल्ले हे चिंताजनक असून महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना हि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी असून आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवत आहे.पुढील काळात देखील संघटना पत्रकारांच्या व समाजातील दुर्बल घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल असा विश्वास मोहिते पाटील यांनी दिला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू बोराटे यांनी तर प्रस्ताविक शिवाजी पवार यांनी केले तसेच पत्रकारांच्या वतीने मनोगत सत्यजित रणवरे व भीमसेन उबाळे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय शिंदे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...