पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावच्या पूर्व पठारावर विराजमान असलेल्या भवानी मातेच्या मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत देवीचे दर्शन घेतल्याने मंदिर परिसर अक्षरशः दणाणून गेला .
यावेळी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख अभिजित जगताप सासवड शहर प्रमुख राजेंद्र जगताप तसेच दादासाहेब पवार मोतीराम गावडे सतीश पवार रोहिदास चव्हाण ह.भ. प. माणिक महाराज पवार सचिन पवार हरीश दुबळे अतुल नाझरे तंटामुक्तीचे अध्यक्ष जालिंधर पवार यांसह गुलाब भुजबळ जयराम पवार आदींच्या उपस्थितीत देवीच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले .तर नवरात्र उत्सवानिमित्त भल्या पहाटे शेकडो महिला भाविकांनी देखील येथील भवानी मातेचा डोंगर सर करून देवीच्या शिवकालीन मंदिरात विविध धार्मिक विधींसह देवतेला कडाकण्या बांधण्यासाठी मोठी गर्दी केल्याने मंदिर परिसर गजबजून गेला होता .यावेळी मंदिराचे पुजारी गणेश भोसले यांनी देखील भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी विशेष परिश्रम घेतले .
अशातच देवी नवसाला पावणारी असल्याने देवीच्या दर्शनासाठी परगावाहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.मात्र देवीच्या देवालयापर्यंत भाविकांच्या गाड्या पोहचण्यासाठी पक्क्या रस्त्याची गरज असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुरंदर तालुकाप्रमुख अभिजित जगताप यांनी व्यक्त केले.
टिप्पण्या