*ॲड. राहुल मखरेंची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व प्रवक्तापदी नियुक्ती.*
*प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले नियुक्तीचे पत्र*
*इंदापूर* (दि.१३) ॲड. राहुल मखरे यांना महाविद्यालयीन काळापासून सामाजिक कामाची आवड आहे. अविरत काम करून तरुण पिढीचे नेतृत्व करत शिव,शाहू फुले,आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून व सामाजिक कामातून तरुण वर्ग ॲड.राहुल मखरेंच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाला आहे. कोरोना काळात गोरगरिबांना अन्नधान्य, वैद्यकीय आदी मदत सामाजिक जाणीवेतून ॲड.राहुल मखरे यांनी केली. गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी विनामूल्य वकीली आजतागायत करत आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून भीमा कोरेगाव चौकशी आयोगात विनामूल्य विधीज्ञ म्हणून ॲड. राहुल मखरे महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
ॲड.राहुल मखरेंनी दि.३० सप्टेंबर २०२४ रोजी पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब,पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (बापू) शेवाळे व हजारो समर्थकांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सामाजिक काम करण्याची जिद्द पाहून थेट राज्य पातळीवर सरचिटणीस व प्रवक्ता म्हणून पक्षाच्या माध्यमातून काम करण्याची संधी ॲड. राहुल मखरे यांना प्राप्त झाली आहे.
या नवीन जबाबदारीसह नव्या आव्हानांना पेलवत आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची वाटचाल अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, त्याचबरोबर इतर महत्त्वाचे प्रश्न हे प्रदेश स्तरावरून सोडवण्यासाठी भर देणार आहे. असे नियुक्तीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ॲड. राहुल मखरे यांनी म्हटले आहे.
ॲड. राहुल मखरे यांना नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुपूर्द केले आहे. ॲड. राहुल मखरे यांचे सर्वत्र कौतुक, अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या